R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या संभाजी ब्रिगेडच्या भूमिकेवर भाजपाचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली प्रतिक्रिया !

संभाजी ब्रिगेडच्या भूमिकेवर भाजपाचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली प्रतिक्रिया !

 

मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपशी युती हाच पर्याय असा लेख लिहिल्याने राज्याच्या राजकारणात एकचं खळबळ उडाली होती. कारण स्थापनेपासून आजपर्यंत केवळ आणि केवळ संघ-भाजप रडारवर असताना, पुरुषोत्तम खेडेकर यांनी थेट भाजपशी युती करण्याचं भाष्य केल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे.

त्यातच संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या या प्रतिक्रियेनंतर आता भाजपची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. दरेकर म्हणाले, “संभाजी ब्रिगेडने असं वक्तव केलं असेल तर त्याचं स्वागतच असेल. महाविकास आघाडीला आरक्षण राखता आलं नाही हे मराठा समाजातील लोकांना समजलं आहे. निवडणुका लढावाव्या की नाही हे वरच्या पातळीवर निर्णय घेतील. मराठा समाजातील अजून किती बळी या सरकारला हवे आहेत हा माझा प्रश्न आहे . सरकारला जाग येत नसेल तर दुर्दैव आहे”

तर प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, “पुरुषोत्तम खेडेकर यांनी मुखपत्रातून त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपकडून असा कोणताही अद्यापपर्यंत निर्णय नाही. त्यांची ऑफर काय आहे हे बघूनच हा सगळा निर्णय घेतला जाईल” असे त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments