R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "माजी मंत्री म्हणू नका..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा दावा !

“माजी मंत्री म्हणू नका…”; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा दावा !

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधक सतत महाविक आघाडी सरकारवर टीका करताना दिसून येत आहे. त्यातच राज्यात भाजपा नेते अनेकदा काही दिवस थांबा, महाविकास आघाडी सरकार स्वत: कोसळेल. राज्यात पुन्हा भाजपाचं सरकार लवकरच येईल असा दावा करत आले आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेतेही आमचं सरकार ५ वर्ष चालेल. कुणीही हे सरकार पाडू शकत नाही असं प्रतिदावा करत आहे. त्यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा सूचक दावा केला आहे.

देहू येथील एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात जे विधान केले त्यावरुन तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यात एकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल असं विधान केल्याने नेमकं चंद्रकांतदादांना काय सूचित करायचं आहे हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. या तिन्ही पक्षात अंतर्गत वाद असला तरी उघडपणे कुणीही भाष्य करत नाही. त्यात चंद्रकांत पाटलांनी २-३ दिवसांत कळेल हे विधान केल्याने नेमकं काय घडेल हे पाहणं उत्सुकतेचे आहे. यापूर्वी सुद्धा राणे कुटुंबीयांनी अनेकवेळा सरकार पडण्याच्या अनेक तारखा जाहीर केल्या होत्या मात्र अद्यापही सरकार स्थिर आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

Recent Comments