R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याऐवजी महापालिका तिजोरीवर पदपथाचा खड्डा- प्रभाकर शिंदे

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याऐवजी महापालिका तिजोरीवर पदपथाचा खड्डा- प्रभाकर शिंदे

महापालिकेने कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर मुख्य रस्ते, उद्याने आणि पर्जन्य जलवाहिन्यांच्या विकासकामांना कात्री लावली असतानाच काही विशिष्ट भागात ठराविक पदपथाच्या सुधारणा आणि सुशोभीकरणासाठी कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी कश्यासाठी? यापुढे संपूर्ण मुंबईमध्ये अशी कामे होणार आहेत का? असा सवाल करत भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी या अवाजवी, अनावश्यक उधळपट्टीबद्दल स्थायी समितीत सत्ताधारी आणि प्रशासनाला धारेवर धरले. पश्चिम उपनगरातील पी / दक्षिण विभागातील एम. जी. रस्त्यालगतच्या पट्ट्यांची आणि पदपथांची आणि एच / पूर्व विभागातील आर. के. पी. व संत ज्ञानेश्वर मंदिर रस्त्यालगतच्या पट्टयांची आणि पदपथांची मास्टीक अस्फाल्ट व सिमेंट काँक्रीटमध्ये अनुक्रमे सुधारणा व सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत आला आहे.

सदर पदपथाच्या सुधारणा आणि सुशोभीकरणासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि पर्यावरण, पर्यटन, पालकमंत्री यांना बैठक घेऊन नंतर पुन्हा आढावा बैठक घ्यावी लागते? मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी आढावा बैठकीत निर्देश दिले असून हे काम महापालिका आयुक्त करत आहेत की, राज्य सरकार असाही प्रश्न उपस्थित होतो. सदर रस्ते मुख्य किंवा हमरस्ते नाहीत. यापूर्वी मुंबई शहरात कित्येक पदपथांची कामे सीएसआर फंडातून करण्यात आली आहेत. जेव्हा मुख्यमंत्री आणि पालकमंत्री सदर कामासाठी बैठका घेतात तेव्हा त्या स्तरावर महापालिकेच्या तिजोरीत हात घालण्यापूर्वी सीएसआर फंडातून हे काम करणे शक्य झाले नसते का ? असाही प्रश्न गटनेते श्री. शिंदे यांनी उपस्थित केला.

यापूर्वी मुंबई शहरात कितीतरी पदपथ आणि रस्त्यालगतच्या पट्ट्यांची कामे सल्लागाराविना अभियंत्यांनी समाधानकारकरित्या पूर्ण केलेली आहेत. मात्र, सदर कामासाठी कामाच्या किंमतीच्या अडीच टक्के म्हणजेच ५० लाख रुपयांच्या सल्लागार शुल्काची उधळणूक कश्यासाठी? आणि मुख्य बाब म्हणजे सल्लागार म्हणून नेमण्यात आलेले वास्तुविशारद हे ‘हेरिटेज एम्पेनल्ड सल्लागार’ आहेत. मुळात पदपथाच्या कामासाठी ‘हेरिटेज एम्पेनल्ड सल्लागार’ कश्यासाठी? पदपथ ही वास्तू हेरिटेज आहे का? अशीही टीका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

Recent Comments