R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति कोल्हापुरात मंडलिक-मुश्रीफ आघाडीत फूट, एकूण ७ सदस्यांनी दिले पदाचे राजीनामे

कोल्हापुरात मंडलिक-मुश्रीफ आघाडीत फूट, एकूण ७ सदस्यांनी दिले पदाचे राजीनामे

 

कोल्हापुरातील कसबा सांगाव या ग्रामपंचायतीत मंडलिक आणि मुश्रीफ गटाची आघाडी आहे. मात्र, आता मंडलिक-मुश्रीफ गटाच्या आघाडीत फूट पडल्याचं दिसून येत आहे या ग्रामपंचायतीमधील सात सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याने आघाडीत फूट पडली आहे. या राजीनामा नाट्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकूणच परिस्थिती पाहता गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करणअयात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा सांगाव या ग्रामपंचायतीमध्ये खासदार संजय मंडलिक आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाने एकत्र येत आघाडी करुन ग्रामपंचायतीवर वर्चस्व निर्माण केलं. चार वर्षांपासून या आघाडीची ग्रामपंचायतीवर सत्ता होती. मात्र आता ग्रामपंचायतीमधील सात सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यामधील कागल तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत कसबा सांगाव आहे. या ठिकाणी मंडलिक आणि मुश्रीफ गटाची एकत्रित सत्ता आहे. सरपंच रणजित कांबळे सदस्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत या सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. एकूण सात सदस्यांनी अचानक राजीनामे दिल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती लक्षात घेता गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रंजना माळी, विरश्री जाधव, उपसरपंच विक्रमसिंह जाधव, दीपक हेगडे, सारिका मगदूम, पद्मावती जाधव, राहुल हेरवाडे या सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले असल्याची माहिती समोर येत आहे

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments