R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home क्राइम विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरलेल्या आपल्याच पोटाच्या मुलाची केली हत्या !

विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरलेल्या आपल्याच पोटाच्या मुलाची केली हत्या !

 

प्रेमामध्ये अडथळा ठरणार्‍या स्वत:च्या पोटच्या गोळ्याला आईने प्रियकराच्या मदतीने जीवे ठार मारल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बुधवारी रात्री पोलिसांना घनसावंगी फाट्यावर मुलाचा मृतदेह सापडला.तालुक्यातील डावरगाव येथील शीतल विनोद उघडे या विवाहित महिलेने तिच्या जावाला उपचारासाठी अंबड येथे एका खासगी रूग्णालयात दाखल केले. नंतर औषध आणण्याच्या निमित्ताने शीतल आपल्या सहा वर्षाचा मुलगा आदित्यला सोबत घेऊन गेली आणि मुलाला तिथे एक व्यक्तीच्या हवाली केले. नंतर शीतल उघडे हिने मुलगा हरवल्याची अंबड पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली.

मात्र पोलिस यंत्रणा तपास करत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यात शीतल उघडे हिने आपल्या पोटच्या मुलाचा खून केल्याचं कळून आलं. शीतलचा प्रियकर नवनाथ जगधने आणि त्याच्या मित्राने मुलाला अंबड-घनसावंगी रोडवर नेले. रस्त्याच्या बाजूला नेऊन त्याच्या तोंडात कापडी बोळा कोंबला. त्यानंतर निर्दयीपणे या चिमुकल्याचा जीव घेतल्याचा आरोप आहे.

शीतल उघडे आणि नवनाथ जगधने यांच्यात विवाहबाह्य प्रेम संबंध होते. मात्र या प्रेम संबंधात शीतलचा सहा वर्षांचा मुलगा अडसर ठरत होता. त्यामुळे आईनेच मुलाला प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या हवाली करून खून करवले. या घटनेमुळे एकाच खळबळ उडाली आहे. सध्या तिच्यावर आणि प्रियकरावर अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

अंधश्रद्धेने आणखी एका निष्पाप लहान बालकाचा घेतला जीव

  कोल्हापूर | दोनच दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या चुमकल्याचा मृतदेह घरापासून शंभर मीटरवर आढळून आल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील कापशी गावात मंगळवारी घडली आहे. मृतदेहावर...

असंख्या महिलांना लागणे अमिश दाखून फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेच्या पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

  पुणे | देशभरातील शंभर महिलांना लग्नाचे आमिष देऊन फसविणाऱ्या भामट्याला अखेर पिंपरी- चिंचवडमध्ये अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला...

प्रवासी गाढ झोपेत असताना खासगी बस चालकाने जंगलात बस सोडली अन निघून गेला !

  मुंबई | कोकणातील मुंबई-गोवा महामार्गावर धक्कादायक प्रकार घडला असून या घटनेमुळे एकाच खळबळ उडाली आहे. सिंधुदुर्गातील बांद्याहून मुंबईला येणाऱ्या काळभैरव ट्रॅव्हल्स या खासगी बसच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments