R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या .....नो बॉलवर माझी विकेट पडली' संजय राठोडांनी सांगितला तो किस्सा !

…..नो बॉलवर माझी विकेट पडली’ संजय राठोडांनी सांगितला तो किस्सा !

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले होते. त्यातच या पूजा चव्हाणच्या मृत्यू नंतर वादात अडकलेले शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूनंतर अनेक ऑडिओ क्लिप समोर आल्या होत्या. यामध्ये संजय राठोड यांचा आवाज असल्याचा दावा केला जात होता. दरम्यान विरोधी पक्षानेही हा विषय लावून धरला होता. त्यामुळे शेवटी संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

दरम्यान पुन्हा त्यांना मंत्री मंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू झाली होती. तसेच मंत्री उदय सामंत यांनी तसे सेनेत सुद्धा दिले होते. आज यवतमाळ येथे एका वर्तमानपत्राच्या लोकार्पण सोहळ्याला संजय राठोड हजर होते. यावेळी लोकांशी संवाद साधताना त्यांनी अनुभवाचा उल्लेख केला. पूजा चव्हाण प्रकरण माध्यमांनीही लावून धरलं होतं.

वारंवार येणाऱ्या नवनव्या ऑडिओ क्लिप आणि फोटोंमुळे संजय राठोड यांच्या भोवती संशयाचं वलय निर्माण झालं होतं. त्यात लोकशाहीचा चौथा स्तंभ माध्यमांनीही या विषयातील प्रत्येक हालचालीची अपडेट दिली होती. त्याची आठवण काढत माजी वनमंत्री संजय राठोड म्हणाले की, काही दिवसांपूर्वी माझी नो बॉलवर विकेट गेली होती. त्यामुळे माध्यमांची ताकद काय असते हे सर्वांना माहीत आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

Recent Comments