R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति नाशिक महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे तीन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर !

नाशिक महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे तीन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर !

 

नाशिक महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच मनसेने सुद्धा नाशिक महानगर पालिका काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे सक्रिय झाले आहेत.

अध्यक्ष राज ठाकरे येत्या २१ ते २३ सप्टेंबर दरम्यान ते नाशकाच्या दौऱ्यावर आहेत. महापालिकेवर पुन्हा एकदा झेंडा फडकाविण्यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. नाशिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गटबाजी तशी जुनीच आहे. या गटबाजीमुळे अनेकांनी पक्ष सोडला. मात्र, अजूनही नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये कुरबुरी सुरू असतात. त्यामुळे पक्षाचे कार्यक्रम असो, बैठका असो, की पक्षश्रेष्ठींनी दिलेले आदेश किंवा आंदोलने. एकमेकांना विश्वासात न घेताच त्यांचे नियोजन केले जाते. त्यामुळे राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये विशेष लक्ष घातले आहे.

यापूर्वी एकदा त्यांनी नाशिक दौराही केला. त्यानंतर त्यांचे पुत्र अमित ठाकरे, संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, अमेय खोपकर यांनीही नाशिकवारी केली. तेथील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या साऱ्या तयारीनंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे येत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी स्वतः लक्ष घातल्याने येती महापालिका निवडणूक रंगतदार होणार आहे.

 

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘या’ समस्यांना मुळासकट उखडून फेकावं लागेल, उस्मानाबाद घटनेनंतर रुपाली चाकणकर कडाडल्या

  उस्मानाबाद जिल्ह्यात काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या एक गरीब कुटूंबातील मुलीचा तिच्या बाळंतपणामध्येच मृत्यू झाला आहे. ही घटना ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी...

नवाब मलिक यांच्याकडे समीर वानखेडेंच्या विरोधात पुरावे असतील

  मुंबई | अभिनेता शाहरुख खान याच्या मुलाला एनसीबी अटक केल्यानंतर सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली होती तसेच राज्याच्या राजकारणात सुद्धा एकाच खळबळ माजली होती. त्यातच...

‘नुसते मंत्रालय म्हणू नका, ते तर बंद आहे’ नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

  मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंबीयांनी ठाकरे परिवार आणि शविसेना पक्षावर घणाघाती टीका केलेली दिसून आहे. त्यातच मालवण येथे केलेल्या विधानावरून...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

Recent Comments