R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या उत्तर प्रदेशात विजयाचा पताका फडकावल्यावर 'आप' २४ तासांत ३०० युनिटपर्यंत मोफत वीज...

उत्तर प्रदेशात विजयाचा पताका फडकावल्यावर ‘आप’ २४ तासांत ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देणार

 

उत्तरप्रदेश निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना आता तेथील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, जास्तीजास्त मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. आज आम आदमी पार्टीने देखील याच पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे.

पत्रकारपरिषदेत याबाबतची माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांनी दिली आहे. जर आम आदमी पार्टीचे सरकार उत्तर प्रदेशमध्ये आले, तर राज्यातील जनतेला ३०० यूनिट मोफत वीज दिली जाईल, असे त्यांनी सांगितले आहे. मनीष सिसोदिया यांनी याबाबत ट्विट करून मोठी घोषणा केली आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, उत्तर प्रदेशमध्ये नागरिकांना अवास्तव वीज बिलांपासून मुक्ती देण्यासंबंधी एक महत्वपूर्ण घोषणा..आम आदमी पार्टीचे सरकार आल्याच्या २४ तासांत प्रत्येक व्यक्तीस घरगुती वापरासाठी प्रत्येक महिन्याला ३०० यूनिट पर्यंत मोफत वीज मिळेल. याशिवाय जुने वीज बील माफ, प्रत्येक घरी २४ तास वीज, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे देखील आश्वासन आम आदमी पार्टीकडून देण्यात आले आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments