R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश "विमानतळ नामकरणासाठी तिन्ही पक्षांशी समन्वय साधेन"

“विमानतळ नामकरणासाठी तिन्ही पक्षांशी समन्वय साधेन”

 

नवी मुंबई | नवी मुंबई विमानतळाचा मुद्धा चांगलाच गाजत असून काही दिवसांपासून तेथील स्थानिकांनी स्वर्गीय दि बा पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी सुद्धा याच मुद्द्यावरून घेरण्याचा प्रयत्न सरकारला केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा विचार करून गरज पडल्यास तिन्ही पक्षांशी समन्वय साधून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.

उपमुख्यमंत्री पवार यांनी गुरुवारी सिडकोत बैठक घेऊन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो प्रकल्प, पंतप्रधान आवास योजना, खारघर येथील कार्पोरेट पार्क, नैना आदी प्रकल्पांसह प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

विशेषत: साडेबारा टक्के भूखंड योजना अद्याप अपूर्ण आहे. सिडकोकडे भूखंड शिल्लक नसल्याच्या तक्रारी आहेत. ही बाब नक्कीच चिंताजनक आहे. त्यामुळे केवळ आर्थिक बाजूचा विचार न करता प्रलंबित राहिलेले प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा, अशा सूचना सिडकोला दिल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नियोजनाच्या दृष्टीने शहरात मोकळे भूखंड असणे गरजेचे आहे. तसे निर्देश सिडकोला दिले आहेत. ही घरे बांधताना सर्वसामान्य घटकाला समोर ठेवून पायाभूत सुविधांचे नियोजन होणे गरजेचे आहे. विशेषत: पाण्याची पूर्तता, पार्किंग आदी सुविधांना अधिक महत्त्व दिले गेले पाहिजे असे सुद्धा त्यांनी स्पष्ठ केले होते.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची ‘पाकिस्तानी मैत्री’ भोवणार, पंजाब सरकारकडून चौकशीचे आदेश

  पंजाब | पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आता काॅंग्रेस विरोधात मोर्चा उघडला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन...

राज्यात पहिली ते चौथीचेही वर्ग भरणार; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आढावा

मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मागच्या मार्च महिन्यापासून बंद आलेली महाविद्यालये आणि शाळा पुन्हा एकदा सुरु करण्यात आलेल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात कोरोनाच्या...

पालकमंत्री शोधून सापडत नाहीत, भाजपच्या या नेत्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना लगावला टोला

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधकांनी मंत्र्यांवर आणि आघाडीच्या नेत्यावर बेछुड आरो लगावले आहे. त्यातच आता माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी थेट आघाडीवर टीका...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments