R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home खेळ मनोज पाटील प्रकरणात मनसेची उडी, साहिल खान याला दिला 'हा' इशारा !

मनोज पाटील प्रकरणात मनसेची उडी, साहिल खान याला दिला ‘हा’ इशारा !

 

मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटील याने काल विषारी गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मनोज पाटील याने यावेळी आपल्या सुसाईड नोटमध्ये, अभिनेता साहिल खान याच्यावर आपल्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. मला अभिनेता साहिल खान मानसिक त्रास देत असल्याचा आरोप देखील मनोज याने यात केला आहे.

आता मनोज पाटील याने साहिल खानवर लावलेल्या आरोपानंतर या प्रकरणात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. जर २० सप्टेंबरला साहिल खान मनसे कार्यालयात आला नाही, तर त्याला त्या पद्धतीचा दणका देण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे. दरम्यान, सध्या कूपर रुग्णालयात मनोज पाटील दाखल असून त्याची प्रकृती स्थिर आहे. अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

मनसे मनोज पाटील आणि साहिल खान यांच्यात मध्यस्थी करेल, असं देखील मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितले आहे. साहिल खानला आम्ही बोलावून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करू. मनोज पाटील यांच्या कुटुंबियांशी बोलून आम्ही विषय समजून घेतलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी साहिल खानला बोलावलेले आहे. यावेळी, मनोज पाटील आणि साहिल खान यांच्यातील समज-गैरसमज दूर करू, असं संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या नीरज चोप्राच्या भाल्याला १ कोटी ५० हजारांची बोली

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशविदेशातील पाहुण्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावात टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविलेल्या नीरज चोप्रा या खेळाडूच्या भाल्यासाठी सर्वाधिक १ कोटी ५० हजार रुपयांची...

विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत बीसीसीआय सचिव जय शाह यांचं मोठं विधान !

  नवी दिल्ली | टी -२० विश्वचषकापूर्वी विराट कोहलीचे कर्णधारपद पुन्हा एकदा चर्चेत आले असून आयसीसी वर्ल्ड टी २० नंतरविराट कोहली टी -२० आणि एकदिवसीय...

मुंबईही ‘या’ दिवशी युएईला होणार रवाना, पहिल्याच सामन्यात असतील आमने सामने

  मागाच्या वर्षीप्रमाणे आयपीएल विजेता संघ मुंबई इंडियन्सही शुक्रवारी दुबईला रवाना होण्याच्या तयारीत आहे. दोन्ही संघ १९ सप्टेंबरला युएईमध्ये आयपीएलच्या १४ व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यातील...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments