R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण !

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण !

 

संभाजीनगर | हैदराबादच्या निजामाच्या तावडीतून मुक्त होत स्वतंत्र भारतात सामील होण्यासाठी संस्थानातील स्वातंत्र्यसैनिकांनी लढा देऊन मिळवलेल्या स्वातंत्र्याला आज १७ सप्टेंबर रोजी ७४ वर्षे पूर्ण होत आहेत. या मुक्तिसंग्रामाच्या लढय़ाला उजाळा देतानाच त्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज स्वतः संभाजीनगर येथे उपस्थित राहणार आहेत.

सिद्धार्थ उद्यानातील मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन स्मृतिस्तंभाजवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी ९ वाजता ध्वजारोहण करतील. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मराठवाडय़ातील आठही जिह्यांत उत्साहाने साजरा केला जातो. या दिनानिमित्ताने संभाजीनगर येथे जय्यत तयारी सुरू आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मराठवाडय़ाची मुख्य प्रशासकीय इमारत अर्थात विभागीय आयुक्तालयावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालक मंत्री सुभाष देसाई स्वतः उपस्थित राहून स्मृतिस्तंभाजवळ ध्वजारोहण करतील. ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री मराठवाडय़ातील नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शहरातील इतर नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहतील. शहरातील जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन करतील तसेच पैठण येथील संतपीठाच्या उद्घाटनाची घोषणा करतील.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनासाठी संभाजीनगर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ उद्यान सज्ज झाले आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मृतिस्तंभ परिसरातील भिंतीवर मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास दर्शवणारे फलक लावण्यात आले आहेत.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

Recent Comments