R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या प्रत्यारोपणासाठी लिव्हर आणि किडनी लोकल ट्रेनने कल्याणहुन दादरच्या ग्लोबल रुग्णालयात रवाना

प्रत्यारोपणासाठी लिव्हर आणि किडनी लोकल ट्रेनने कल्याणहुन दादरच्या ग्लोबल रुग्णालयात रवाना

 

संपूर्ण मुंबईकरांची लाइफलाइन असलेली लोकल ट्रेन आता मुंबईकरांचा जीव वाचवण्यासाठी सरसावली आहे . आता पर्यंत ग्रीन कॉरिडोरच्या माध्यमातून दान केलेले अवयव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आल आहे. मात्र मुंबई लोकल ट्रेनमधून, दान केलेले अवयव रूग्णालयापर्यंत पोहोचवने आता मध्य रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे हे शक्य झालं आहे.

मुंबई लोकलमधून एका रुग्णावर प्रत्यारोपण करण्यासाठी लिव्हर आणि किडनी एका रूग्णालयातून दुसऱ्या रूग्णालयापर्यंत पोहोचवण्यात आले आहेत. कल्याण ते दादर असा १ तास ७ मिनिटांचा प्रवास करून हे अवयव सुरक्षितरित्या पोहचवण्यात आले. हे शक्य झालं ते मध्य रेल्वेमुळे. मध्य रेल्वेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

मध्य रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भात ट्विट करण्यात आलं आहे. यामध्ये असं म्हटलंय की, मध्य रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मदतीने ब्रेनडेड रूग्णाचे दान केलेले लिव्हर आणि किडनी हे अवयव जलद आणि सुरक्षित माध्यम असलेल्या मुंबई लोकल ट्रेन “मुंबईची लाईफलाइन”द्वारे पोहोचवण्यात आले. कल्याणमधील फोर्टीस हॉस्पिटल ते परेलच्या ग्लोबल हॉस्पिटलपर्यंतचा हा प्रवास होता अशी महती ट्विटच्या माध्यमांतून देण्यात आलेली आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments