R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home मनोरंजन 'तुम्ही २०२४ मध्येही पंतप्रधान व्हावं आणि देशाची सेवा करावी' कंगनाने वाढदिवसादिवशी पंतप्रधान...

‘तुम्ही २०२४ मध्येही पंतप्रधान व्हावं आणि देशाची सेवा करावी’ कंगनाने वाढदिवसादिवशी पंतप्रधान मोदींकडे व्यक्त केली इच्छा !

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरातून नाही तर विदेशातून सुद्धा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्त जम्बो लसीकरणाच्या कार्यक्रमाची आखणी केली आहे. त्याच आता अभिनेत्री कंगना राणावत हिने सुद्धा मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कंगनाने एक मोठी पोस्ट लिहून तसेच स्टोरी पोस्ट करून तिने पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत. कंगना ने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘तुम्ही 2024 मध्येही पंतप्रधान व्हावं आणि देशाची सेवा करावी’ अशी इच्छा ही कंगनाने तिच्या पोस्ट मध्ये व्यक्त केली आहे. तसेच नरेंद्र मोदी आणि प्रभू श्रीराम यांचा एडिट केलेला एक फोटोही कंगनाने शेअर केला आहे.

दरम्यान कंगनाने अनेकदा राजकीय वक्तव्य देखील केली आहेत. तर अनेकदा पंतप्रधान मोदींच्या अनेक निर्णयाच स्वागत करताना ती दिसली आहे. तसेच मोदी हे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान असल्याचं तिने एकदा म्हटलं होतं. तर आता तिसऱ्यांदा ही मोदींनीच देशाचे पंतप्रधान व्हावे अशी तिने इच्छा व्यक्त केली आहे.

त्याचप्रमाणे इतर अभिनेत्यांनी सुद्धा पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, करण जोहर, हेमा मालिनी, मनिष मल्होत्रा, रणदीप हुडा, रकुल प्रीत सिंगसह अनेक सेलिब्रिटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

“बिग बॉसमध्ये जाण्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते”

  'बिग बॉस'मध्ये जाण्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते मात्र तेथे जाण्याचा माझा मार्ग चुकला असला तरी हेतू प्रामाणिक होता. यापुढे मात्र...

” भाजप नेत्याकडून महात्मा गांधी आणि राखी सावंतची तुलना”

  नवी दिल्ली | महात्मा गांधी कमी कपडे घालायचे परंतु कमी कपडे घातल्याने कोणी महान होत असेल तर राखी सावंत महान झाली असती असे वादग्रस्त...

जेठालालने घटवले तब्बल १० किलो वजन, हे आहे त्यामागचे गुपित |

  लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या कित्येक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, तारक मेहता, बबिता, भिडे अशा सर्वच...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments