R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या भाजपाच्या सेवा व समर्पण अभियानाला विविध उपक्रमांनी प्रारंभ

भाजपाच्या सेवा व समर्पण अभियानाला विविध उपक्रमांनी प्रारंभ

गरजूंना धान्य वाटप, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संपर्क अशा विविध उपक्रमांनी भारतीय जनता पार्टीच्या सेवा व समर्पण अभियानाला राज्यात प्रारंभ करण्यात आला.अभियानानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यावर आधारीत छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उदघाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजनांची प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी करून गरीब कल्याणाचा संकल्प प्रत्यक्षात आणला आहे. यावेळी राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, अभियान प्रमुख राज पुरोहित, प्रदेश सचिव संदीप लेले, महिला मोर्चा अध्यक्ष उमा खापरे, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आदी उपस्थित होते.

संभाजीनगर येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते बियाणांचे वितरण करण्यात आले. नाशिक येथे नवजात बालकांपासून ते 18 वर्ष वयापर्यंतच्या लाभार्थीसाठी आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यावेळी उपस्थित होत्या. नागपूर येथे महानगर अध्यक्ष आ. प्रवीण दटके, आ. मोहन मते यांच्या उपस्थितीत गरजूंना अन्नधान्याचे वितरण करण्यात आले. मुंबईत माटुंगा येथील डेविड ससून चिल्ड्रेन स्कूलमधील मुलांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.

पुणे शहरात पंतप्रधान आवास योजना, उज्वला गॅस योजना, आयुष्यमान भारत योजना इत्यादी सुमारे ५२ योजनांचा लाभ सामान्य नागरिकांना घेता यावा यासाठी प्रबोधन केले जाणार आहे. त्याचा प्रारंभ खा. गिरीश बापट यांच्या हस्ते झाला. १ कार्यकर्ता २५ लाभार्थी हे अभियान संपूर्ण पुणे शहरात राबविण्यात येणार आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments