R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश कृषी कायद्याच्या विरोधात अकाली दलाचा दिल्लीत मोर्चा !

कृषी कायद्याच्या विरोधात अकाली दलाचा दिल्लीत मोर्चा !

 

नवी दिल्ली | केंद्रातील मोदी सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या आठ महिन्यापासून दिल्लीच्या वेशीवर केंद्रातील मोदी सरकार विरोधात आंदोलन करतं आहेत. या आंदोलनाला देशातून नाही तर विदेशातून सुद्धा पाठिंबा देण्यात आला होता. आता त्या पाठोपाठ अकाली दलाने सुद्धा मोदी सरकार विरोधात आंदोलन पुकारले होते.

कृषी कायद्याला एक वर्ष झाल्याच्या निषेधार्थ अकाली दलाने शुक्रवारी दिल्लीत ‘ब्लॅक फ्रायडे प्रोटेस्ट मार्च’ काढला होता. पोलिसांनी मात्र परवानगी नाकारल्याने रस्ते जाम झाले. यावेळी सुखबीर सिंग बादल यांनी अटक करून घेतली. दिल्लीत पोलिसांनी ट्रॅफिक अलर्ट जारी केला असून, सकाळी आठपासूनच रस्ते जाम होते. शेतकरी व कार्यकर्ते दिल्लीत येत असताना झाडोदा कला सीमा बंद करण्यात आली, तर पंडित श्री राम मेट्रो स्टेशन आणि बहादूरगड सिटी मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले.

‘ब्लॅक फ्रायडे’ निषेध मोर्चात सहभागी होण्यासाठी दिल्लीत येणाऱ्या अकाली दलाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सीमेवरच थांबविले आहे. शिरोमणी अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ रकाबगंज गुरुद्वारापासून निदर्शने सुरू केली होती. कृषी कायदा रद्द करण्याची मागणी अकाली दलाने केली आहे. सकाळी दहा वाजता मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची ‘पाकिस्तानी मैत्री’ भोवणार, पंजाब सरकारकडून चौकशीचे आदेश

  पंजाब | पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आता काॅंग्रेस विरोधात मोर्चा उघडला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन...

राज्यात पहिली ते चौथीचेही वर्ग भरणार; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आढावा

मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मागच्या मार्च महिन्यापासून बंद आलेली महाविद्यालये आणि शाळा पुन्हा एकदा सुरु करण्यात आलेल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात कोरोनाच्या...

पालकमंत्री शोधून सापडत नाहीत, भाजपच्या या नेत्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना लगावला टोला

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधकांनी मंत्र्यांवर आणि आघाडीच्या नेत्यावर बेछुड आरो लगावले आहे. त्यातच आता माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी थेट आघाडीवर टीका...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments