R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home क्राइम प्रवासी गाढ झोपेत असताना खासगी बस चालकाने जंगलात बस सोडली अन निघून...

प्रवासी गाढ झोपेत असताना खासगी बस चालकाने जंगलात बस सोडली अन निघून गेला !

 

मुंबई | कोकणातील मुंबई-गोवा महामार्गावर धक्कादायक प्रकार घडला असून या घटनेमुळे एकाच खळबळ उडाली आहे. सिंधुदुर्गातील बांद्याहून मुंबईला येणाऱ्या काळभैरव ट्रॅव्हल्स या खासगी बसच्या चालकाने प्रवाशांना आणि बसला रस्त्यातच सोडून पळ काढला होता. सर्व प्रवाशी मध्यरात्रि गाढ झोपेत असताना हा प्रकार केला. यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

समोर आलेल्या माहितीनुसार रात्री ३ वाजता एका प्रवाशाला जाग आली. त्याने गाडी का थांबली हे पाहण्यासाठी आपल्या आसनावरुन उठून पुढे जाऊन पाहिले. तर तिथे ड्रायव्हर दिसला नाही. काही मिनिटे वाट पाहिली परंतू तो न आल्याने त्या प्रवाशाने इतर प्रवाशांना उठविण्यास सुरुवात केली. त्यांना या प्रकाराची माहिती दिली.

बस चिपळूणमधील वालोपे गावाच्या हद्दीत जंगल भागात थांबविलेली असल्याने प्रवाशांनी पोलिसांशी संपर्क साधला अखेर पहाटे सव्वाचारच्या सुमारास चिपळूण पोलिसांचे एक पथक प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दाखल झाले. त्यानंतर बसचा मालक, त्यांचा बुकिंग एजंट यांचे फोन लावण्यास सुरुवात झाली. परंतू, त्यांच्यापैकी कोणाचेही फोन लागत नसल्याने प्रवाशांना मदत मिळू शकली नव्हती.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

अंधश्रद्धेने आणखी एका निष्पाप लहान बालकाचा घेतला जीव

  कोल्हापूर | दोनच दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या चुमकल्याचा मृतदेह घरापासून शंभर मीटरवर आढळून आल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील कापशी गावात मंगळवारी घडली आहे. मृतदेहावर...

असंख्या महिलांना लागणे अमिश दाखून फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेच्या पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

  पुणे | देशभरातील शंभर महिलांना लग्नाचे आमिष देऊन फसविणाऱ्या भामट्याला अखेर पिंपरी- चिंचवडमध्ये अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला...

विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरलेल्या आपल्याच पोटाच्या मुलाची केली हत्या !

  प्रेमामध्ये अडथळा ठरणार्‍या स्वत:च्या पोटच्या गोळ्याला आईने प्रियकराच्या मदतीने जीवे ठार मारल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बुधवारी रात्री पोलिसांना घनसावंगी फाट्यावर मुलाचा मृतदेह सापडला.तालुक्यातील...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments