R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या कोल्हापुरात सोमय्या यांच्यावर ठोकण्यात येणाऱ्या अब्रूनुकसानीच्या दाव्यासाठी निधी संकलन

कोल्हापुरात सोमय्या यांच्यावर ठोकण्यात येणाऱ्या अब्रूनुकसानीच्या दाव्यासाठी निधी संकलन

 

कोल्हापूर | भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांचे पुत्र तथा गोकुळ दूध संघाचे संचालक नावेद मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे गंभीर आरोप केले. या आरोपांनंतर हसन मुश्रीफ चांगलेच आक्रमक झाले असून सोमय्या यांच्यावर आपण लवकरच १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची घोषणा केली आहे. याच दाव्यासाठी न्यायालयात भरण्यासाठी लागणाऱ्या निधीचं संकलनही कोल्हापुरात सुरू करण्यात आलं आहे.

किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर मुश्रीफ यांनी ताबोडतोब पत्रकार परिषद घेत हे आरोप फेटाळून लावले होते. तसंच सोमय्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे जाहीर केले होते. याच पार्श्वभूमीवर १०० कोटी रुपयांचा दावा दाखल करण्यासाठी २५ टक्के रक्कम दावापूर्व भरणे गरजेचे असते.

तसेच सदर रक्कम या दाव्यामध्ये २५ कोटी रुपये होते. त्यामुळे सोमय्या यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्यासाठी हसन मुश्रीफ यांना लोकवर्गणी देण्यासाठी त्यांच्या मतदार संघात स्पर्धा सुरू झाली आहे. गडहिंग्लज शहर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने दहा लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध समाज बांधव, संघटना, तरुण मंडळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वर्गणीतून ही रक्कम उभी करण्यात येणार आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments