R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या सतेज, तुम्ही अजून राज्यमंत्रीच कसे..? अजित पवारांची विचारणा !

सतेज, तुम्ही अजून राज्यमंत्रीच कसे..? अजित पवारांची विचारणा !

 

पुणे | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर काँग्रेस तर्फे कोल्हापूरचे मंत्री सतेज पाटील यांना राज्यमंत्री पद देण्यात आले होते. मात्र वयोमानानुसार यांना आतापर्यंत कॅबिनेट मंत्री नियुक्ती करण्यात यायला पाहिजे अशी चर्चा मागच्या अनेक महिन्यानापासून कोल्हापुरात होती होती. आता याच विषयाला थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हात घातला आहे,

सतेज पाटील तुमचे वय ५० असेल, तर तुम्ही अजून राज्यमंत्रीच कसे..काँग्रेसने तुम्हाला कॅबिनेट मंत्री का केले नाही, अशी थेट विचारणाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यातील कार्यक्रमात केली. आकुर्डी येथील डी. वाय. पाटील ज्ञानशांती इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे उद्घाटन पवार यांच्याहस्ते झाले.

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या राज्यमंत्री म्हणून करत असलेल्या कामाची दखल घेऊन ते म्हणाले, सतेज, तुमचे वय ५० असेल, तर तुम्हाला काँग्रेसने अजून कॅबिनेट मंत्री का केले नाही..? शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादीतील माझ्यासह जयंत पाटील व अन्य नेत्यांना पंचेचाळीसाव्या वर्षीच ही संधी दिली. कॅबिनेट मंत्री असाल तर धडाडीने काही निर्णय घेता .येतात. त्याच धडाडीने ते राबवताही येतात. त्यामुळे ही संधी तुम्हाला आतापर्यंत मिळायला हवी होती. काँग्रेस तुम्हाला अजून किती वर्षे राज्यमंत्रीच ठेवणार आहे, अशी विचारणाही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी केली.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments