R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या घरी भेट...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या घरी भेट |

 

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नांदेड जिल्ह्यातील आले होते. यावेळी त्यांनी मुदखेड येथील केंद्रीय राखीव पोलीस बलकॅम्प येथे वृक्ष लागवड व सैनिक संमेलनात सामील झाले होते. मात्र या दौऱ्यानंतर खासदार प्रताप पाटील चिखलीकर जोरदार चर्चेत आले आहेत. कारण केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आपल्या दौऱ्यातर प्रताप पाटील चिखलीकर यांच्या घरी अनपेक्षित भेट दिली आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी अशोक चव्हाण यांना लोकसभा निवडणुकीत खासदार झालेले प्रताप पाटील चिखलीकरांच्या घरी थेट भेट देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. गृहमंत्र्यांच्या चिखलीकर यांच्या अनपेक्षित भेटीने राजकारण्यांच्या मात्र भुवया उंचावल्या आहेत. परंतु गृहमंत्र्याच्या या गृह भेटीने प्रताप पाटील चिखलीकरांचे संसदेतील राजकीय वजन वाढून केंद्रीय मंत्री पदाच्या अशा वाढल्या आहेत.

राज्याच्या तुलनेत नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या जिल्ह्यातून कोणत्याही भाजपा नेत्यास केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळाले नाही. मात्र या गृहभेट व चहा पानाने चिखलीकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाबाबतच्या आशा वाढल्या आहेत. खासदारांच्या घरी जात केंद्रीय गृहमंत्री यांनी चिखलीकर परिवारातील चिमुकल्यांशी भेटत फोटो देखील काढले. या भेटीने नांदेडसह मराठवाड्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

Recent Comments