R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति राज्याचे उपमुख्यमंत्री हे राज्याचे की पिंपरी चिंचवडचे हे समजत नाही - चंद्रकांत...

राज्याचे उपमुख्यमंत्री हे राज्याचे की पिंपरी चिंचवडचे हे समजत नाही – चंद्रकांत पाटील

 

पुणे | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचे विधान केले होतं. आता या विधानाचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला आहे. सनसनाटी बातम्या निर्माण केल्यानं काही होत नाही असा टोला लगावला आहे. पुण्यात मानाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला

पाटील म्हणाले की, सनसनाटी बातम्या निर्माण केल्यानं काही होत नाही. एकाही आमदाराला ते घेऊ शकत नाहीत. या राज्याचे उपमुख्यमंत्री हे राज्याचे की पिंपरी चिंचवडचे हे समजत नाही. ते कोरोना काळात राज्यात बाहेर कुठं गेले. पिंपरी चिंचवडची महापालिका माझ्या नेतृत्वाखाली होणार असं म्हणून त्यांनी स्वत:ला लहान केलं असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

यावेळी त्यांनी राज्यात माजी मंत्री म्हणू नका यावर सुरु असलेल्या चर्चंवेर भाष्य केलं होतं. मला माजी मंत्री म्हणू नका याची क्लिप चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आली. माजी मंत्री म्हणू नका हे दुसऱ्या नेत्यासाठी होतं असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. कितीही माणसं पळवण्याचा प्रयत्न करा काही होणार नाही. तसंच लोकांचे नगरसेवकांवर प्रेम नाही मोदींवर प्रेम आहे. त्यामुळे जाणाऱ्यांनी विचार करावा. तुम्हाला पुन्हा परतीची वाट नाही असा इशाराही त्यांनी दिला.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments