R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या भाजपा नेते रजिंदरपाल सिंग भाटिया यांची गळफास घेऊन आत्महत्या !

भाजपा नेते रजिंदरपाल सिंग भाटिया यांची गळफास घेऊन आत्महत्या !

 

छत्तीसगड | भाजपाचे नेते आणि माजी परिवहनमंत्री रजिंदरपाल सिंग भाटिया यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार रजिंदरपाल सिंग यांनी गळफाय घेऊन आत्महत्या केली आहे. मात्र या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर येऊ शकले नाही.

सध्या पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. राजनांदगाव जिल्ह्यातील खुज्जी विधानसभा मतदारसंघातून रजिंदरपाल सिंग भाटिया हे आमदार म्हणून निवडून आले होते. रमण सिंग सरकारच्या पहिल्या कार्यकाळात रजिंदरपालसिंग भाटिया यांना मंत्रिपदही देण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मंत्रिपदावरून हटवून सीएसआयईडीसीचे चेअरमन बनवण्यात आले होते.

२००३ मध्ये रजिंदरपाल सिंग भाटिया यांना भाजपाने तिकीट दिले होते. तसेच मंत्रीही बनवले होते. मात्र २००८ मध्ये पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नव्हती. २०१३ मध्येही पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यानंतर ते अपक्ष म्हणून निवडणूक लढले होते. मात्र त्यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

भाटिया राजनांदगावमधील छुरिया परिसरामध्ये आपल्या धाकट्या भावासह वास्तव्यास होते. रविवार संध्याकाळी ते घरी एकटे होते. कुटुंबीय जेव्हा घरी पोहोचले तेव्हा त्यांना ते गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आले. त्यानंतर या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments