R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया तुळजाभवानीच्या प्राचीन अलंकरावर डल्ला; तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांना अटक

तुळजाभवानीच्या प्राचीन अलंकरावर डल्ला; तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांना अटक

 

तुळजाभवानीच्या प्राचीन अलंकरावर डल्ला मारणाऱ्या तत्कालीन धार्मिक व्यवस्थपक दिलीप नाईकवाडी यांना रविवारी रात्री तुळजापूर पोलिसांनी अटक केली. गुन्हा नोंद झाल्यापासून नाईकवाडी तब्बल एक वर्ष गायब होते. मात्र, अखेर त्याला पोलिसांनी अटक केली.

पाळीकर पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर कल्याणराव गंगणे यांनी त्याचे वकील शिरीष कुलकर्णी यांच्या मार्फत तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे ९ मे २०१९ रोजी याबाबत लेखी तक्रार केली होती, त्यांनतर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी तात्काळ याचे गांभीर्य ओळखून चौकशी समिती नेमली होती. त्यात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले होते.

तुळजाभवानी मंदिर संस्थानचा धार्मिक व्यवस्थापकपदी दिलीप नाईकवाडी हे कार्यरत असताना २९ नोव्हेंबर २००१ ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत नाईकवाडी यांनी पदाचा दुरुपयोग करत तुळजाभवानी मंदिर संस्थान व भाविकांची फसवणूक केली असून त्यांच्या ताब्यात असलेल्या तुळजाभवानी देवीचा खजिना व जामदार खान्यातील अतिप्राचिन अलंकार, वस्तू तसेच भाविकांनी अर्पण केलेले सुमारे ३४८.६६१ ग्रॅम सोने व सुमारे ७१६९८.२७४ ग्रॅम चांदीच्या वस्तू तसेच ७१ प्राचीन नाणे यांचा वैयक्तिक स्वार्थासाठी अपहार चोरी केली.

या फिर्यादीवरुन पोलिसांनी तत्कालिन धार्मिक व्यवस्थापक दिलीप देविदास नाईकवाडी विरोधात पोलीस ठाण्यात ३२३ कलम ४२०, ४६४, ४०९, ४६७, ४६८, ४७१, ३८१ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी मुधोळ यांची बदली झाल्यानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेश दिल्यावर रविवार १३ सप्टेंबर २०२० रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी तथा तहसीलदार योगिता कोल्हे यांनी फिर्याद दिल्याने तात्कालिन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी विरोधात फसवणूक गुन्हा दाखल केला होता.

देवीच्या खजिन्यातील तब्बल ७१ प्राचीन नाण्यासह अनेक दागिने व अलंकार गायब झाले होते. तुळजाभवानी देवीला अनेक राजांनी यांनी अर्पण केलेले बहुतांश मौल्यवान व प्राचीन दागिने तिजोरीतून गायब करून गैरव्यवहार केल्याचे अपर जिल्हाधिकारी यांच्या 3 सदस्यीय चौकशीत निष्पन्न झाले होते त्यांत नाईकवाडी यांच्यावर ठपका ठेवत सोने चांदीच्या दागिन्यात काळाबाजार झाल्याचे निष्पन्न झाले होते. तुळजाभवानी मातेला निझाम, औरंगजेब , पोर्तगीज यांच्यासह बिकानेर उदयपूर लखनो बडोदा आणि इंदोर या घराण्यांतील राजे महाराजे यांनी त्यांच्या चलनातील पुरातन नाणी देवि चारणी अर्पण केली होती.

या नाण्याची नोंद तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या रेकॉर्डमध्ये १९८० पर्यंत होती मात्र २००५ व  २०१८ मध्ये करण्यात आलेल्या पंचनाम्यात या पुरातन ७१ नाण्यांसह प्राचीन सोन्या चांदीच्या वस्तू आणि मौल्यवान अलंकार दप्तरी नोंदीत नसल्याचे उघड झाले होते. गंगणे यांनी माहितीच्या अधिकारात तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या साठा नोंद दप्तराची मागणी केली होती त्यात ७१ पुरातन नाणी गायब झाल्याचे उघड झाले होते , अखेर या प्रकरणात आरोपी अटक झाल्याने अनेक बाबी उघड होणार आहेत.

तुळजाभवानी देवीला अनेक राजे महाराजे यांनी सोने चांदी दागिन्यासह नाणी अर्पण केली होती त्याची नोंद मंदिर संस्थांच्या वहीत होती मात्र पदभार स्विकारताना व देताना अनेक  मौल्यवान वस्तू व दागिने गायब करून त्याचा काळाबाजार करण्यात आल्याचे चौकशीत सिद्ध झाले होते. या घोटाळ्यातील गुन्ह्यात सहभागी अधिकारी यांची व्याप्ती वाढणार असल्याचे दिसते.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘राज्यातील काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर’ देवेंद्र फडणवीसांचा थेट आघाडी सरकारवर आरोप |

  मुंबई | दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...

विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा देत सुरुवात पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेंची भाषणाला केली सुरुवात

  आवाज दाबणारा कुणी जन्माला येऊ शकत नाही. १९६६ पासून शिवसेनेची आभिमानास्पद वाटचाल. शिवसैनिक हे शस्त्र. मी मुख्यमंत्री आहे असे वाटू नये तर कुटुंबातील सदस्य आहे....

काय सांगता | ५ महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीने लस घेतल्याचा आला मॅसेज !

  संपूर्ण देशभरात कोरोनाच्या संसर्गाला रोखनसाठी युद्ध पातळीवर लसीकरण मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. तसेच खाजगी आणि सरकारी रुग्णालयात आता केंद्र सरकारने लसीचे डोस उपलब्द...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments