R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'किरीट सोमैय्यांनी चंद्रावर, मंगळावर जाऊन आमच्या जमिनी शोधाव्यात'

‘किरीट सोमैय्यांनी चंद्रावर, मंगळावर जाऊन आमच्या जमिनी शोधाव्यात’

 

मुंबई | माजी खासदार किरीट यांना आज कराड येथी रेल्वे स्थानकावर महालक्ष्मी ट्रेनमधून उतरवण्यात आले होते. यावर आता सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. प्रशासन आणि पोलीस माझे शत्रू नाहीत, त्यांच्या विनंतीनुसार मी उतरत आहे. कऱ्हाडमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कराड येथे पत्रकार परिषेद घेऊन हसन मुश्रीफ यांच्यावर घणाघाती आरोप लगावले आहेत.

मात्र कराड स्थानकावर सोमय्या यांच्यावर ठाकरे सरकारच्या दडपशाहीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कारवाईवर सोमय्या यांनी जोरदार टीका केली आहे. मात्र या कारवाईवर आता खुद्द शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोमय्यांवरील कारवाई मुख्यमंत्री कार्यालया तर्फे नाही तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशाने करण्यात आलेली आहे असे स्पष्टीकरण दिले आहे.

किरीट सोमैय्यांनी चंद्रावर जाऊन, मंगळावर जाऊन आमच्या लोकांच्या जमिनी शोधाव्यात. या देशात लोकशाही आहे, देशात व्यक्तीस्वातंत्र्य आहे, आरोप कोणीही करू शकतं, आरोप करणाऱ्यांच्या तोंडाला टाळं लावता येत नाही. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर सरकारला कारवाई करावी लागते असे त्यांनी यावेळी राऊत यांनी बोलून दाखविले होते.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments