R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home बॉलिवूड कर बुडवण्याचा लावण्यात आलेल्या आरोपांवर सोनू सूद म्हणतो की,

कर बुडवण्याचा लावण्यात आलेल्या आरोपांवर सोनू सूद म्हणतो की,

 

मुंबई अभिनेता सोनू सूद कोरोना लाॅकडाऊनच्या काळात प्रचंड चर्चेत आला होता. परप्रांतीय कामगारांना त्यांच्या गावी जाण्यासाठी मदत करून सोनू सूदने लोकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. मात्र आयकर विभागाने सोनूवर कर बुडवल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर सोनूने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सोनूने इन्स्टाग्राम तसेच ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टला कठीण रस्त्यांवर देखील प्रवास सोपा वाटतो तसेच प्रत्येक भारतीयांच्या प्रार्थनेचा परिणाम होतोय असं वाटतय, असं कॅपशन दिलं आहे. सोनूने शेअर केलेल्या पोस्टमध्ये दर वेळी तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची गरज नसते, वेळ सगळं सांगते, असं सोनूने म्हटलं आहे. मी भाग्यावान आहे की मला भारतातील गरजू लोकांना मदत करण्याची संधी मिळाली.

पुढे तो म्हणतो की, माझ्या फाऊंडेशनमधील प्रत्येक रुपया मौल्यवान जीव वाचवण्यासाठी आणि गरजू लोकांसाठी असल्याचं सोनूने म्हटलं आहे. या संपुर्ण पोस्टच्या खाली सोनूने कर भला, हो भला, अंत भले का सब भला, असं लिहिलं आहे. सोनूने शेअर केलेल्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी तसेच अनेकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

समीर वानखडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर पत्नी क्रांती रेडकर म्हणते की,

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर वानखडे मुंबई क्रुझ रेव्ह पार्टीवर छापेमारी करताना अटक केली आहे. आर्यन खान याला ड्रग्जचं सेवन करत असल्याचा आरोप एनसीबी'ने...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृह होणार सुरु, मात्र पाळावे लागणार हे नियम

  मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह मागच्या दीड वर्षांपासून सुरक्षितेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आली होती. या निर्णयामुळे या क्षेत्रातील निवडीत असलेल्या...

अमीर खानच्या CEAT टायर जाहिरातीवर भाजप खासदाराने घेतला आक्षेप

  मुंबई | अभिनेता अमीर खान यांची CEAT तयार कंपनीबरोबर केलेली जाहिरात सध्या वधाच्या भोवऱ्यात सापडली असून या जहरातीवर भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments