R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home मनोरंजन " भाजप नेत्याकडून महात्मा गांधी आणि राखी सावंतची तुलना"

” भाजप नेत्याकडून महात्मा गांधी आणि राखी सावंतची तुलना”

 

नवी दिल्ली | महात्मा गांधी कमी कपडे घालायचे परंतु कमी कपडे घातल्याने कोणी महान होत असेल तर राखी सावंत महान झाली असती असे वादग्रस्त विधान भाजप नेते हृदय नारायण दिक्षित यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी टीकेची तोफ गाडली आहे.

उत्तर प्रदेशच्या एका कार्यकमात हृदय नारायण दिक्षित म्हणाले की महात्मा गांधी यांना सारा देश बापू म्हणायचे. गांधी वृत्तपत्र वाचायचे आणि कमी कपडे घालयाचे. जर कमी कपडे घातल्यावर कोणी महान होत असेल तर राखी सावंत महान झाली असती. मी सहा हजार पुस्तकं वाचली आहे आणि त्याचे विश्लेषण केले आहे असेही दिक्षित म्हणाले.

दिक्षित यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीका झाली. ट्विटरवर त्यांनी एक पोस्ट करून यावर प्रतिक्रिया दिली आहे. दिक्षित म्हणाले की माझ्या एका वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. पुस्तक आणि लेख लिहिल्यामुळे कोणी प्रबुद्ध होत नाही. गांधी कमी कपडे घालायचे, लोक त्यांना बापो म्हणायचे याचा. अर्थ असा नाही की राखी सावंतही महात्मा गांधी होईल. माझ्या वक्तव्याचा अर्थ नीट समजून घ्या असे आवाहनही त्यांनी केले आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“बिग बॉसमध्ये जाण्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते”

  'बिग बॉस'मध्ये जाण्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते मात्र तेथे जाण्याचा माझा मार्ग चुकला असला तरी हेतू प्रामाणिक होता. यापुढे मात्र...

जेठालालने घटवले तब्बल १० किलो वजन, हे आहे त्यामागचे गुपित |

  लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या कित्येक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, तारक मेहता, बबिता, भिडे अशा सर्वच...

साहिल खानचं करिअर संपण्यामागे सलमान खानचा मोठा हात !

  अभिनेता साहिल खानवर मुंबईतील मॉडेल आणि बॉडीबिल्डर मनोज पाटील याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल सतत मनोजला करियर संपवेल अशी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments