R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति किरीट सोमय्या काय ED चे प्रमुख आहेत का? सुप्रिया सुळेंनी सुनावले खडीबोल...

किरीट सोमय्या काय ED चे प्रमुख आहेत का? सुप्रिया सुळेंनी सुनावले खडीबोल !

 

भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यां यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर दोन वेळा घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपामुळे राज्यात राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. यावरुन महाविकास आघाडीतील नेत्यांनी सोमय्यांसह भाजपवर टिकेची झोड उठवली आहे. यातच आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रीय यंत्रणा चलन फाडणाऱ्या पोलिसांसारखे वाटत आहेत. किरीट सोमय्या हे सीबीआयचे प्रमुख आहेत का? की ED चे डायरेक्टर आहेत का? असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. त्यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर होत आहे.
यांच्यातून काही निघणार नाही, मात्र आम्ही लढत राहणार आहोत.सत्य कधी पराजित होत नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

त्या दरम्यान बोलताना सुप्रिया सुळेंनी पत्रकारांच्या प्रश्नांवरही उत्तर दिलं आहे. तुमची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का, असा सवाल विचारला असता, त्यावेळी सुळे म्हणाल्या की, ‘जेंडर ट्रॅपमध्ये अडकायचे नाही. चांगलं काम करणारा व्यक्ती मुख्यमंत्री असावा’ अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

शिवसेना खासदार भावना गवळींना पुन्हा ईडीचे समन्स

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांना, खासदार आणि आमदारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागला आहे. त्यातच शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या...

इंधन दरवाढीवर आंदोलन करणारा भाजप आता गप्प का ?

  मुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे आज बेरोजगारीमुळे उपासमारीची वेळ आलेली असताना त्यात दुसरीकडे वाढत्या इंधनदरवाढीमुळे सामान्य व्यक्ती हतबल झाला आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments