R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मोक्षदा पाटील यांची बदली, निमित गोयल यांनी पदभार स्वीकारला !

मोक्षदा पाटील यांची बदली, निमित गोयल यांनी पदभार स्वीकारला !

 

औरंगाबाद | औरंगाबादच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची बदली करण्यात आली असून यांच्या जागी नवे पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी पदभार स्वीकारला. काही दिवसापूर्वीच औरंगाबादच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची बदली झाली होती. त्यांच्या जागी निमित गोयल यांची नियुक्ती झाली आहे. नवे पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी पदभार स्वीकारला.

शहरात गणेशोउत्सव सण पार पडल्यानंतर निमित गोयल यांनी कारभार हाती घेतला. मोक्षदा पाटील यांची बदली लोहमार्ग पोलीस अधीक्षक, औरंगाबाद विभागात करण्यात आली आहे.औरंगाबाद शहरातील पाच महत्त्वाच्या पदांवर वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे औरंगाबादच्या पोलिसदलात नारीशक्तीचे दर्शन घडणार आहे.

नव्याने झालेल्या बदल्यांनुसार, औरंगाबाद लोहमार्ग पोलीस अधीक्षकपदी मोक्षदा पाटील यांची बदली झाली आहे. तसेच शर्मिला घार्गे या औरंगाबाद गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षकपदी असतील. तसेच राज्य गुप्तवार्ता विभागात मीना मकवाना या उपायुक्त पदावर असतील. उज्ज्वला वनकर आणि अपर्णा गीते या शहर पोलिस उपायक्तपदाची धुरा हाती घेतील.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

Recent Comments