R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति 'आम्ही चौकशी केली, त्यात कोणताही घोटाळा झालाच नाही फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला !

‘आम्ही चौकशी केली, त्यात कोणताही घोटाळा झालाच नाही फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला !

 

मुंबई | भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर लावलेल्या आरोपानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले होते. त्यातच मुश्रीफ यांनी पत्रकार परिषेद घेऊन आम्ही सुद्धा तत्कालीन सरकारचे घोटाळे बाहेर काढू असे विधान केले होते. त्यामुळे जलयुक्त शिवार या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात घोटाळा झाल्याचा आरो आता आघाडी सरकारकडून करण्यात येत आहे.

यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जलयुक्त शिवार योजना म्हणजे सर्वात यशस्वी झालेली योजना आहे. राज्यातील शेतीसाठी पाण्याचं प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही जलयुक्त शिवार योजना राबवली होती. राज्यातील शेतीसाठी पाण्याची कमतरता भासू नये म्हणून हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला होता. या योजनेत कसलाही घोटाळा नाही, असं सांगतानाच फडणवीस यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या योजनेत कसलंही काळेबेरे नाही, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या या महत्वाकांक्षी योजनेवर ९६३४ कोटी रूपये खर्च केले होते. कॅगच्या अहवालात फडणवीस यांच्या या योजनेवर ताशेरे ओढण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारने फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

शिवसेना खासदार भावना गवळींना पुन्हा ईडीचे समन्स

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांना, खासदार आणि आमदारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागला आहे. त्यातच शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments