R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू, शिष्य आनंद गिरी यांच्यावर संशय !

महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू, शिष्य आनंद गिरी यांच्यावर संशय !

 

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी महाराज यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मात्र या प्रकरणी पोलिसांनी नरेंद्र गिरी यांचे शिष्य आनंद गिरी यांना हरिद्वारमधून ताब्यात घेतलं आहे. उत्तर प्रदेश पोलीस एडीजी लॉ एंड प्रशांत कुमार यांनी आनंद गिरीला ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. या संदर्भात प्रसिद्ध वृत्तपत्राने माहिती दिली आहे.

प्रशांत कुमार म्हणाले, ‘अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यश्र महंत नरेंद्र गिरी यांचा मृत्यू झाल्याची माहिती शिष्याने दिली. आयजी तिकडे गेले होते त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दरवाजा आतून बंद होता. शिष्यांनी दरवाजा ठोठावला पण नरेंद्र गिरी यांनी काही प्रतिसाद दिला नाही. हा दरवाजा नंतर तोडण्यात आला. ज्यावेळी महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह आढळून आला. या ठिकाणी पोलिसांना एक सुसाईड नोटही मिळाली.’

‘या सुसाईड नोटमध्ये नरेंद्र गिरी यांनी आनंद गिरी आणि इतर दोन शिष्यांच्या विरोधात काही आरोप केले आहेत. नरेंद्र गिरी यांनी सुसाईड नोटमध्ये असं म्हटलं आहे की माझ्या मृत्यूला हेच लोक जबाबदार आहेत.’ या सगळ्यानंतर आनंद गिरी यांना हरिद्वारमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. याआधी महंत नरेंद्र गिरी यांचे शिष्य आनंद गिरी यांनी मुलाखतीत सांगितलं होतं की ते हरिद्वारमध्ये आहेत. त्यांनी हेदेखील सांगितलं की हे खूप मोठं षडयंत्र आहे, पोलीस अधिकारीही मिळालेले आहेत. मठाची संपत्ती विकण्यासाठी जे उत्सुक आहेत असे लोक या कटात सहभागी आहेत . या प्रकरणात मोठे भूमाफियाही सहभागी आहेत.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

Recent Comments