R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या गीतेेच्या विधानावर राजकीय व्यासपीठावर समाचार घेतला जाईल, सुभाष देसाई यांचे सूचक विधान

गीतेेच्या विधानावर राजकीय व्यासपीठावर समाचार घेतला जाईल, सुभाष देसाई यांचे सूचक विधान

 

माजी केंद्रीय मंत्री यांनी भाष्य करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली होती. महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे, असे अनंत गीते म्हणाले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना माजी केंद्रीय मंत्री शिवसेनेचे अनंत गीते यांनी स्वपक्षीयांना घरचा आहेर दिला आहे. दोन्ही काँग्रेस जर एक होऊ शकत नाहीत तर शिवसेना आणि काँग्रेस कदापि एक होऊ शकत नाहीत, असं अनंत गीते म्हणाले. यावर आता शिवसेना नेते आणि मंत्री सुभाष देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुभाष देसाई म्हणाले की, राजकीय व्यासपीठावर समाचार घेतला जाईल. तर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देखील गीतेंच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत, असं म्हणत त्यांनी गीतेंच्या वक्तव्यावर एकप्रकारे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे गीते यांचे हे विधान त्यांच्या अडचणी वाढवणार असेच चित्र दिसून येत आहे.

काय म्हणाले होते गीते

दोन्ही काँग्रेस जर एक होऊ शकत नाहीत तर शिवसेना आणि काँग्रेस कदापि एक होऊ शकत नाहीत, असं अनंत गीते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच मुळात काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत, महाविकास आघाडी सरकार ही केवळ सत्तेसाठीची तडजोड असल्याची आठवण त्यांनी करून दिली.

 

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments