R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति ठाणे मनपाच्या अनधिकृत बांधकामांविरोधी कारवाई थांबवण्यासाठी केंद्रीय मंत्र्याचा फोन !

ठाणे मनपाच्या अनधिकृत बांधकामांविरोधी कारवाई थांबवण्यासाठी केंद्रीय मंत्र्याचा फोन !

 

ठाणे | सध्या ठाणे मनपा मध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच शीतयुद्ध पेटलेले दिसून येत आहे त्यातच ठाणे मनपाने सुरु केलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात आता अनेकांना धडकी भरली आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाई थांबववण्यासाठी मला केंद्रीय मंत्र्यांकडून फोन येतात, असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानं नवीन वाद निर्माण झाला होता. त्यामुळे तो केंद्रीय मंत्री नेमका कोण, असा प्रश्न आता निर्माण झालाय.

सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या आपल्यावर झालेला हल्ला हा अनधिकृत बांधकामांवर केलेल्या कारवाईमुळेच झाला, या वक्तव्यावरून अनधिकृत बांधकामांचा प्रश्न अधिक चिघळला आहे. सोमवारी भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी यासंदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित केला. पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात काय पत्रव्यवहार केला आहे? तसेच बांधकामं तोडण्याच्या संदर्भात पालकमंत्र्यांचे काय आदेश आहेत? या आदेशाची प्रत मिळावी, अशी मागणी त्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सभागृहात केली.

यावेळी अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी देखील पत्रव्यवहार केला. मात्र त्यांचे नाव का घेण्यात आले नाही? असा प्रश्न महापौर नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला. यावर भाजप राजकारण करत असल्याचा आरोप महापौरांनी यावेळी केला. महासभेत भाजपच्याच प्रश्नाला उत्तर देत महापौरांनी अनधिकृत बांधकाम विरोधी कारवाई थांबवावी यासाठी केंद्रीय मंत्र्यांचा कॉल आल्याचं सांगितलं या विधानामुळे एकाच गोंधळ निर्माण झाला होता.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

“मी शिवसेनेत होतो तेव्हा ते खासदार सुद्धा नव्हते, भुजबळांनी लगावला टोला

  नाशिक | नाशिक येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना टोला लगावला होता....

‘या’ समस्यांना मुळासकट उखडून फेकावं लागेल, उस्मानाबाद घटनेनंतर रुपाली चाकणकर कडाडल्या

  उस्मानाबाद जिल्ह्यात काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या एक गरीब कुटूंबातील मुलीचा तिच्या बाळंतपणामध्येच मृत्यू झाला आहे. ही घटना ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

Recent Comments