R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या किरीट सोमय्या पुन्हा येत्या मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर

किरीट सोमय्या पुन्हा येत्या मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर

 

मुंबई | मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप लावून पुन्हा एकदा भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या येत्या २८ सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहे अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मुलुंड, सीसीएसटी पोलिसांनी गैरमार्गाने मला रोखले. येत्या २४ तासांत मुंबई व मुलुंड पोलिसांनी कारवाई मागावी. तसेच पुन्हा कोल्हापूर येत्या मंगळवारी दि. २८ रोजी अंबाबाईच्या दर्शनाला जाणार असल्याचे भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर दाैरा कसा होणार याकडे लक्ष लागून राहणार आहे.

बुधवारी किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर किरीट सोमय्या कोल्हापूरला महालक्ष्मी एक्सप्रेसमधून रवाना झाले होते. मात्र त्यांना कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी जिल्हाबंदी असल्याचा आदेश दिला होता. अशावेळी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कराड येथील रेल्वे स्टेशनवरती कराड पोलिसांनी किरीट सोमय्या यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर कराडमधून त्यांना मुंबईला परतावे लागले होते.

किरीट सोमय्या म्हणाले, कोल्हापूरला मी मंगळवारी जाणार आहे. अंबाबाई मातेचे दर्शन घेणार आहे. त्या संदर्भात कोल्हापूरचे जिल्हाधिकारी व पोलिस प्रमुख यांना कल्पना दिलेली आहे. त्यामुळे मी कोल्हापूरला जाणारच आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments