R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार वाढले

तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार वाढले

 

राज्यात महिलांवरील अत्याचाऱ्याच्या मुद्द्यावर २ दिवसाचे अधिवेशन बोलावण्यात यावे असे पात्र राज्यपाल कोसयारी यांनी मुख्यमंत्र उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. तर दुसरीकडे मुख्यमंत्री ठाकरे यांनी या पात्राला सडेतोड उत्तर देत राज्यपालांना जोरदार टोला लगावला होता. आता या पाटोपाठ काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि ट्विट करून तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात वाढलेल्या अत्याचाराचा लेखाजोखा प्रसिद्ध केला आहे.

फडणवीस सरकार हे महाराष्ट्रातील महिलांसाठी कर्दनकाळ झाले होते याची आठवण काँग्रेसने भाजपला करून दिली आहे. महिला अत्याचारांमध्ये भाजपशासित उत्तर प्रदेश आघाडीवर असल्याचे नुकताच जाहीर झालेल्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (2020)च्या आकडेवारीनुसार स्पष्ट दिसत आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात मात्र महाराष्ट्रातील महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये घट झाल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले.

महिला अत्याचाराच्या प्रश्नावर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे या भाजपच्या मागणीला उचलून धरत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील महिलांचा विचार करत संसदेचे चार दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे ती योग्यच असल्याचे सचिन सावंत म्हणाले. तसेच महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या काळात 2020ला त्यात घट होऊन महिला अत्याचारांची संख्या 31 हजार 954 झाली तर गँगरेप व मर्डरच्या 20 घटना झाल्या. फडणवीस सरकारच्या तुलनेत खूपच कमी असल्याचे सचिन सावंत म्हणाले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments