R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति इतर पक्षापेक्षा भाजपचे ४५ खासदार राजकीय घराण्याची संबंधित

इतर पक्षापेक्षा भाजपचे ४५ खासदार राजकीय घराण्याची संबंधित

 

नवी दिल्ली | भाजपचे तब्बल ४५ खासदार राजकीय घराण्यांमधील असल्याचा दावा करत कॉंग्रेसचे खासदार रिपून बोरा यांनी बुधवारी त्यांची यादी जाहीर केली. तसेच राजकीय घराण्यांची पार्श्‍वभूमी असणाऱ्या भाजप खासदारांची संख्या देशातील इतर कुठल्याही पक्षापेक्षा अधिक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. कॉंग्रेसकडून घराणेशाहीचे राजकारण केले जात असल्याचा आरोप यापूर्वी भाजपाकडून करण्यात आलं होता. मात्र आता तो दावा काँग्रेसकडून खोडून काढण्यात आला आहे.

आज तागायत भाजपात घराणेशाहीच्या राजकारणाला थारा देत नसल्याचे चित्र भाजपकडून उभे केले जाते. मात्र, संसदेच्या दोन्ही सभागृहांतील भाजपच्या ३८८ खासदारांपैकी ४५ जणांनी राजकीय घराणेशाहीची पार्श्‍वभूमी आहे. भाजपमध्ये किंवा त्या पक्षाच्या सरकारांमध्ये आता किंवा याआधी २७ परिवारांमधील २ ते ३ सदस्यांनी विविध पदे भुषवली. केंद्रात कॉंग्रेसची सत्ता असताना केवळ नेहरू-गांधी परिवारातील सदस्य पंतप्रधान बनल्याचा खोटा प्रचार भाजप करतो. मात्र, कॉंग्रेसच्या 6 पंतप्रधानांपैकी तिघेच त्या परिवाराचे सदस्य होते, याकडे बोरा यांनी लक्ष वेधले.

देशातील इतर राजकीय पक्षांमध्येही एकाच कुटूंबातील अनेक सदस्य विविध पदे भुषवतात. त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस, सप, तृणमूल कॉंग्रेस, द्रमुक, नॅशनल कॉन्फरन्स, राजद, तेलंगण राष्ट्र समिती, शिरोमणी अकाली दल आदींचा समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले. बोरा यांनी पत्रकारांशी बोलतानाही भाजपला घराणेशाहीच्या राजकारणावरून इतरांवर टीका करण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र उत्तरप्रदेशात आमदार आहेत. अनुराग ठाकूर, पियूष गोयल आणि धर्मेंद्र प्रधान या केंद्रीय मंत्र्यांचे वडील माजी मुख्यमंत्री किंवा माजी केंद्रीय मंत्री आहेत अशी माहिती बोरा यांनी दिली होती.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

Recent Comments