R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना ५० हजाराची मदत, राज्य सरकारची माहिती

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना ५० हजाराची मदत, राज्य सरकारची माहिती

 

नवी दिल्ली | मार्च महिन्यात आलेल्या कोरोना संसर्गामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना राज्य सरकारांकडून ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली. राज्य सरकारांच्या आपत्ती निवारण निधीतून ही मदत दिली जाईल, असंही केंद्र सरकारने कोर्टात सांगितलं. देशात आतापर्यंत तब्बल ४ लाख ४६ हजार कोरोनाचे बळी गेले आहेत.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कोरोनामृतांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपये देण्याची शिफारस केली होती. याचसंबंधी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं. इथून पुढच्या काळामध्ये ज्यांना कोरोना संसर्गाने मृत्यू होईल, त्यांच्या कुटुंबीयांना ही मदत दिली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने कोर्टात दिली.

काय करावे लागेल

१) मदतीची रक्कम मिळविण्यासाठी मृतांच्या कुटुंबीयांना सरकारी छापील अर्ज किंवा हॉस्पिटलच्या प्रमाणपत्रासह जिल्हा आपत्ती निवारण निधी अधिकारी किंवा त्यांच्या कार्लालयात अर्ज सादर करावा लागेल.

२) या अर्जावर संबंधित यंत्रणेला ३० दिवसांत निर्णय घ्यावा लागेल

३) मदत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल

४) अर्जावर निर्णय घेण्यासाठी जिल्हा पातळीवर समिती असणार

५) समितीला जर अर्ज फेटाळायचा असेल तर त्याचे लेखी कारण देणं बंधनकारक

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments