R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या गोवा प्रभारी फडणवीसांच्या भेटीनंतर उत्पल मनोहर पर्रीकर निवडणुकीच्या रिंगणात

गोवा प्रभारी फडणवीसांच्या भेटीनंतर उत्पल मनोहर पर्रीकर निवडणुकीच्या रिंगणात

 

गोवा | माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल मनोहर पर्रीकर हे पणजी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. बुधवारी रात्री उशिरा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांची २० मिनिटे भेट घेऊन त्यांनी पर्रीकर यांच्या निधनानंतर पणजीतील पक्षाचे काम आपण पुढे कसे नेले आहे, याची सविस्तर माहिती दिली.

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी मिळाली नसली तरी नाराज न होता उत्पल यांनी पणजीत काम करणे सुरू ठेवले. केवळ पक्षाच्याच नव्हे तर पर्रीकर यांच्यासाठी त्यांना मतदान करणाऱ्यांच्या गाठीभेटी घेणे त्यांनी सुरू केले आहे. आज प्रत्येकजण त्यांना विधानसभा निवडणूक लढवा, आम्ही तुमच्यात मनोहर पर्रीकर यांना पाहतो, असे सांगू लागला आहे. याचमुळे भाजप विचारसरणीचा कट्टर विरोधकही पर्रीकर नावाच्या गारुडामुळे उत्पल यांना भेटून तुम्ही पुढे व्हा, आम्ही बाकी सारी व्यवस्था पाहतो असे सांगण्यास मागेपुढे पाहत नाही.

या साऱ्या बळावर उत्पल यांनी पणजीतील उमेदवारीवर दावा करण्याचे ठरवले आणि अतिशय स्पष्ट शब्दात फडणवीस यांना आपण पणजीतून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगितले आहे. ते इच्छुक होते हे समजण्यास फार उशीर झाला. आता उमेदवारीसाठी विचार कसा करायचा, असा तात्त्विक प्रश्न पुढे फेकण्यासाठी त्यांनी आता भाजप नेत्यांना जागाच ठेवलेली नाही.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments