R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मोदी यांच्या वाढदिवसादिवशी चार महिन्यापूर्वी मृत व्यक्तीचं आलं लसीकरण प्रमाणत्र

मोदी यांच्या वाढदिवसादिवशी चार महिन्यापूर्वी मृत व्यक्तीचं आलं लसीकरण प्रमाणत्र

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी १७ सप्टेंबरला देशभरात २.५ कोटी लोकांना लस देत नवा रेकॉर्ड करण्यात आला. मात्र या आकडेवारीमध्ये गडबड असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. याचं कारण त्या दिवशी २७ लाख लस दिल्याची नोंदणी करणाऱ्या मध्य प्रदेशातील काही त्रुटी समोर आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर या वाढदिवसाचे औचित्य साधून देशभसरात लसीकरण मोहीम राबवली गेली होती.

तसेच यामधील काही प्रकार तर आश्चर्यकारक आहेत. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार अनेकांना तर करोनाची लस घेतली नसतानाही लसीकरण प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. भोपाळमध्ये राहणाऱ्या आशुतोष शर्मा यांना १७ सप्टेंबरला रात्री ८ वाजता मोबाइलवर एक मेसेज आला. “विद्या शर्माजी, १७ सप्टेंबरला भारताने लसीकरणाचा नवा रेकॉर्ड केला त्याच दिवशी तुम्हाला कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस यशस्वीपणे देण्यात आला,” असं या मेसेजमध्ये लिहिण्यात आलं होतं.
विद्या शर्मा या आशुतोष शर्माच्या आई आहेत.

मात्र चार महिन्यांपूर्वीच विद्या शर्मा यांचं करोनामुळे निधन झालं होतं. त्यामुळे आशुतोष शर्मा यांना धक्काच बसला. त्यांनी आईच्या नावे आलेलं लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड करुन सेव्हदेखील केलं आहे. माझ्या एका हातात आईचं मृत्यू प्रमाणपत्र असून दुसऱ्या हातात लसीकरण प्रमाणपत्र आहे. मला वाटतं लसीकरणाचा आकडा वाढवण्यसाठी अधिकाऱ्यांवर जास्तच दबाव होता असं शर्मा यांनी बोलताना सांगितले होते.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments