R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या भाजपा कार्यलयात महिला सुरक्षित नाहीत, सचिन सावंत यांनी साधला निशाणा !

भाजपा कार्यलयात महिला सुरक्षित नाहीत, सचिन सावंत यांनी साधला निशाणा !

 

भाजपाच्या महिला नगरसेविका अंजली खेडकर यांच्या संपर्क कार्यालयात भाजपा कार्यकर्त्याने महिलेची छेड काढण्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईतील बोरिवलीत वॉर्ड क्रमांक १६ राम मंदिर रोड वझीरा नाका येथे अंजली खेडकर यांचे कार्यालय आहे. या कार्यरत हा प्रकार घडला असून सद प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता याच मुद्दयावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत याबद्दल ट्विट करून माहिती दिली आहे की भाजपाच्या महिला विरोधी कशी भूमिका आहे या मधून दिसत आहे असं त्यांनी म्हटलं आहे ते आपली ट्विटमध्ये म्हणतात की, भाजपाच्या महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. आत्ता बोरीवली पो ठाण्यात भाजपा नगरसेविका कार्यालयात महिलेचा भाजपा कार्यकर्त्याने विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. दुर्दैव म्हणजे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी व आमदार सुनील राणे यांच्याकडे तक्रार करून न्याय मिळाला नाही.

‘इतर भाजपा नगरसेविका व नेत्यांनी तक्रार करणाऱ्या महिलेलाच मारहाण केली. ‌महिला भाजपा कार्यालयात सुरक्षित नाहीत व तीलाच छळले जाते आणि अत्याचार करणाऱ्याला पाठीशी घातले जाते. महिला विरोधी भाजपाचा जाहीर निषेध! ज्यांनी प्रकरण दाबले त्या भाजपा नेत्यांवर कारवाई झाली पाहिजे ‌’ असं ट्विट सावंत यांनी केलं आहे.

 

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments