R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति डोंबिवलीमधील सामूहिक बलात्काराचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, भाजपा महिला मोर्चाची मागणी

डोंबिवलीमधील सामूहिक बलात्काराचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, भाजपा महिला मोर्चाची मागणी

 

डोंबिवलीच्या सामूहिक बलात्काराच्या घटनेतील उर्वरीत आरोपींना अटक करण्यात यावी तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे यांनी प्रसिद्ध पत्रकात केली आहे.
श्रीमती उमाताई खापरे यांनी पत्रकात म्हटले आहे कि, राज्यात सध्या दुर्दैवी घटना घडताना दिसत आहेत, आजचीच घटना, डोंबिवलीमध्ये 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली. प्रियकराने जानेवारी महिन्यात पीडित मुलीवर बलात्कार करत व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर 29 जणांनी बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या पीडितेला उपचारासाठी ठाणे येथील रुग्णालयात दाखल केले आहे.

श्रीमती उमाताई खापरे यांनी पत्रकात म्हटले आहे कि, सध्या परिस्थितीमध्ये पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी ही खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसं पाहिलं तर रोज राज्यात दोन तीन ठिकाणी बलात्कार होत आहेत. पोलिस यंत्रणा का काहीच हालचाल करताना दिसत नाही? कुठेतरी हि प्रकरणे दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यामुळे ह्या घटना वाढत चालल्या आहे. जोपर्यंत या घटनेतील नराधमांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत या घटनांना आळा बसणार नाही.

या प्रकरणातील आरोपींना सुरक्षा देण्याचे काम पोलीस यंत्रणेकडून केले जात आहे. त्यामुळे या घटनांमध्ये वाढ होत आहे.राज्य सरकारकडे आम्ही वारंवार शक्ती कायद्याची मागणी करत आहोत, मात्र हे राज्य सरकार या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिलं होतं मात्र मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे बोट दाखवलं. आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून अशी परिस्थिती या राज्य सरकारची झाली आहे. शक्ती कायदा जर आमलात आणला तर निश्चितच या घटनांना आळा बसेल, असे देखील श्रीमती उमाताई खापरे यांनी पत्रकात म्हटले आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘या’ समस्यांना मुळासकट उखडून फेकावं लागेल, उस्मानाबाद घटनेनंतर रुपाली चाकणकर कडाडल्या

  उस्मानाबाद जिल्ह्यात काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या एक गरीब कुटूंबातील मुलीचा तिच्या बाळंतपणामध्येच मृत्यू झाला आहे. ही घटना ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी...

नवाब मलिक यांच्याकडे समीर वानखेडेंच्या विरोधात पुरावे असतील

  मुंबई | अभिनेता शाहरुख खान याच्या मुलाला एनसीबी अटक केल्यानंतर सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली होती तसेच राज्याच्या राजकारणात सुद्धा एकाच खळबळ माजली होती. त्यातच...

‘नुसते मंत्रालय म्हणू नका, ते तर बंद आहे’ नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

  मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंबीयांनी ठाकरे परिवार आणि शविसेना पक्षावर घणाघाती टीका केलेली दिसून आहे. त्यातच मालवण येथे केलेल्या विधानावरून...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments