R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश कोल्हापूर | गोकुळ दूध संघाच्या ऑनलाइन बैठकीला संचालिका शौमिका महाडिक यांचा कडाडून...

कोल्हापूर | गोकुळ दूध संघाच्या ऑनलाइन बैठकीला संचालिका शौमिका महाडिक यांचा कडाडून विरोध

 

कोल्हापूर | गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महाडिक गटाचा दणदणीत पराभव करून पालकमंत्री सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघ आपल्याकडे खेंचूनि घेतला होता. मात्र अद्यापही महाडिक-पाटील वाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच गोकुळ दूध संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने पार पडत आहे. सत्तांतरानंतरची ही पहिलीच वार्षिक सभा होत आहे. ऑनलाईन पद्धतीने होत असलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी विश्वास पाटील असणार आहेत.

मात्र दुसरीकडे सत्तांतरानंतरच्या पहिल्याच ऑनलाईन सभेत राडा होण्याची शक्यता आहे. चार महिन्यात नफ्यात आणल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा आहे, तर सत्ताधाऱ्यांनी तोटा वाढविल्याचा विरोधकांचा आरोप आहे. एक ना अनेक आरोप प्रत्यारोपावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येण्याची शक्यता आहे.vऑनलाईन सभेत सत्ताधारी गटाचा ३२८ कोटींच्या जागा खरेदीचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक यांचा विरोध आहे. इतक्या मोठ्या रकमेच्या खरेदीचा प्रस्ताव ऑनलाइन सभेत का, असा सवाल यानिमित्ताने शौमिका महाडिक यांनी उपस्थित केला आहे.

संघाच्या ऑनलाईन सभेच्या आयोजनावरही शौमिका महाडिक यांनी टीका केली आहे. कोरोना काळात गोकुळ निवडणूक चालली मग ऑफलाईन सभा का नको, असा सवाल शौमिका महाडिक यांनी उपस्थित केला आहे. सर्वसाधारण सभेतच घ्यावा, अशी मागणी केल्याने आजच्या सभेत हा विषय मंजूर होणार का, याकडे सर्वांचं लक्ष असेल.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

समीर वानखेडेऐवजी दुसरा अधिकारी करणार आर्यन खान प्रकरणाचा तपास?

  मुंबई | राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखडे यांच्यावर अनेक स्वरूपाचे गंभीर आरोप लगावून एकच खळबळ उडवून दिली होती. मंत्री नवाब...

कामगारांच्या समस्या मांडून मनसे कामगार सेना कंपनीतून बाहेर पडताच शिवसेनेच्या कामगार संघटनेची कर्मचाऱ्यांना अरेरावी

  मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातील वाद आता सर्वश्रुत आहेत. त्यात येणाऱ्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांमध्ये वाद होत असल्याचे चित्र...

आर्थररोड जेलमध्ये शाहरुखनंतर ‘ही’ व्यक्ती पोहचली आर्यनच्या भेटीला

  मुंबई | ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. दोन दिवसांपूर्वी शाहरुख त्याला जेलमध्ये भेटायला गेला होता. आता बातम्या येत...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

Recent Comments