R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या नाहीतर किरीट सोमय्यांच्या मुंबईतील घरावर मोर्चा काढू, कोल्हापूर शहर आणि जिल्हा कृती...

नाहीतर किरीट सोमय्यांच्या मुंबईतील घरावर मोर्चा काढू, कोल्हापूर शहर आणि जिल्हा कृती समितीचा इशारा

कोल्हापूर | भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर थेट घोटाळ्याचे आरोप लगावत एकच खळबळ उडवून दिली होती तसेच कोल्हापूरचा दौरा आयोजित केला होता. मात्र या दौऱ्याला कोल्हापुरातील असंख्या मुश्रीफ समर्थकांनी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला होता. याच पार्श्वभूमीवर त्यांना पोलिसांच्या सूचनेनुसार कराड स्थानकात उतरवण्यात आले होते आता पुन्हा त्यांनी कोल्हापूरचा दौरा करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापुरातील वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर शहर व जिल्हा कृती समितीच्या वतीने सोमय्यांना कडक इशारा देण्यात आला आहे. ‘भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी कायदा हातात घेऊन कोल्हापुरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, अन्यथा मुंबईत त्यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येईल,’ असा इशारा कुरुत समितीने दिला आहे.

‘कोल्हापूर जिल्ह्याचे जेष्ठ नेते, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप करून माजी खासदार सोमय्या यांनी शांतताप्रिय कोल्हापूरमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी देशाला समतेचा विचार देऊन अन्यायाविरुद्ध लढण्याचा आदर्श घालून दिला, त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जनतेला चिथावणीखोर भाषा वापरुन सोमय्या यांनी डिवचण्याचा प्रयत्न करु नये असे कृती समितीचे अध्यक्ष अशोक पोवार व रमेश मोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments