R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या थिअटर सुरू करण्यासाठी संजय राऊत घेणार लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

थिअटर सुरू करण्यासाठी संजय राऊत घेणार लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

 

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या मार्च महिन्यापासून राज्यातील सर्व थिअटर बंद ठेवण्यात आले आहेत त्यामुळे थियेटर मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे तसेच यावर अवलंबून असलेल्या कर्माची वर्गव्हर्ट आता उपासमारीची वेळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर थिअटर मालकांच्या मदतीसाठी आता थेट शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत मैदानात उतरले आहे. तसेच त्यावर लवकरच मुख्यमंत्र्यांनाभेतून तोडगा काढण्याचे अश्वासन सुद्धा त्यांनी दिले आहे.

थिअटर सुरू झाले पाहिजेत. त्यावर लाखो लोकांचा रोजगार अवलंबून आहे. विमानापासून रेल्वे आणि हॉटेल्सही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे थिअटर सुरू व्हावेत, त्यासाठी मी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं. संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना ही मागणी केली आहे.

महाराष्ट्र सोडून सर्व राज्यात थिअटर सुरू झाली आहे. ८५ टक्के कॅपेसिटीने एअरलाईनस् सुरू आहे. रेल्वे सुरू आहे. रेस्टॉरंट सुरू आहे. त्यामुळे थिअटर मालकांना थिअटर सुरू व्हावं असं वाटतं. काल आम्ही भेटलो. चर्चा केली. दोन वर्षांपासून बंद आहे. हजारो लाखो लोकांचा रोजगार त्यावर अवलंबून आहे. मुख्यमंत्र्यांना विनंती करण्याचं ठरलं. मुंबई फिल्म उद्योगाची जनक आहे. इथेच सर्व ठप्प झाल्याने मोठ मोठे कलाकार, दिग्दर्शक, टेक्निशियन आणि इतर कर्मचारी थिअटरमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. त्यात मोठं भांडवल अडकलेलं आहे. या सर्वांचा मुख्यमंत्री गांभीर्याने विचार करतील अशी खात्री आहे. या सर्वांना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असं राऊत म्हणाले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments