R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति पश्चिम महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे वाढवून एसटीच्या तिकिटदरात मेट्रोचा प्रवास करता येणार

पश्चिम महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे वाढवून एसटीच्या तिकिटदरात मेट्रोचा प्रवास करता येणार

 

पुणे | वाघोली ते शिरूर ५० किलोमीटरच्या नव्या आराखड्याच्या भूमिपूजनसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुण्यात दाखल झाले होते. या रस्त्यादरम्यान तळमजल्यावर ८ लेन आणि पहिल्या मजल्यावर ६ लेनचा उड्डाणपूल होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात बोलताना दिली. उड्डाणपुलाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या प्रसंगी गडकरी बोलत होते.

तसेच सागरी सेतू वसई-विरारपर्यंत नेण्याचा विचार असल्याची माहितीही नितीन गडकरी यांनी दिली. दिल्लीला नरीमन पाईंटशी जोडण्याचा मानसही गडकरींनी व्यक्त केला. पुण्यापासून कोल्हापूर, सोलापूर, बारामती, नगर, लोणावळा या मार्गावरील ब्रॉडगेजवर आठ डब्ब्यांची मेट्रो धावणार आहे. या मेट्रोमध्ये विमानासारखी सोय असणार आहे. याचे तिकीट एसटी बसएवढं असेल. ही मेट्रो 140 किमी प्रतितास वेगाने धावेल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. यामुळे लोकांचे पैसे वाचतील आणि पर्यावरणालाही फायदा होईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यात २२१ किलोमीटर लांबीच्या २२ महामार्ग प्रकल्पांचा नारळ गडकरींच्या हस्ते आज शुक्रवारी फोडला गेला. राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून जिल्ह्यात तब्बल १३४ कोटीं रुपयांची रस्ते, पुलांची कामे करण्यात येणार आहेत.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘या’ समस्यांना मुळासकट उखडून फेकावं लागेल, उस्मानाबाद घटनेनंतर रुपाली चाकणकर कडाडल्या

  उस्मानाबाद जिल्ह्यात काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या एक गरीब कुटूंबातील मुलीचा तिच्या बाळंतपणामध्येच मृत्यू झाला आहे. ही घटना ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी...

नवाब मलिक यांच्याकडे समीर वानखेडेंच्या विरोधात पुरावे असतील

  मुंबई | अभिनेता शाहरुख खान याच्या मुलाला एनसीबी अटक केल्यानंतर सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली होती तसेच राज्याच्या राजकारणात सुद्धा एकाच खळबळ माजली होती. त्यातच...

‘नुसते मंत्रालय म्हणू नका, ते तर बंद आहे’ नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

  मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंबीयांनी ठाकरे परिवार आणि शविसेना पक्षावर घणाघाती टीका केलेली दिसून आहे. त्यातच मालवण येथे केलेल्या विधानावरून...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments