R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'पोलिसांनी मला राहत्या घरी कोंडलं'; सोमय्या मुंबई पोलिसांविरोधात तक्रार करणार

‘पोलिसांनी मला राहत्या घरी कोंडलं’; सोमय्या मुंबई पोलिसांविरोधात तक्रार करणार

 

भाजप नेते किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षाविरुद्ध चांगलेच आक्रमक झाले आहेत. किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सोमय्यांनी मुश्रीफांवर आरोप केल्यानंतर त्यांना कोल्हापूरात जाण्यापासून बंदी घालण्यात आली होती. यानंतर माझ्या दौऱ्यामध्ये ठाकरे सरकारकडून खोडा घातला जात आहे. माझ्या घराबाहेर डझनभर पोलिस पाठवण्यात आले, असा आरोप सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर केला होता.

अशातच आता या प्रकरणावर किरीट सोमय्या चांगलेच आक्रमक झाले आहेत. किरीट सोमय्या आज मुंबई पोलिसांविरोधात तक्रार देण्यासाठी जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. याबद्दल सोमय्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, मुंबई पोलिसांनी मला १९ सप्टेंबर रोजी घर कार्यालयात कोंडून ठेवलं. तसेच CSMT स्टेशनच्या बाहेर अडथळा निर्माण केला. या विरोधात मी २४ सप्टेंबर रोजी पोलीस तक्रार प्रधिकरण येथे दुपारी २ वाजता तक्रार दाखल करणार आहे, अशी माहिती सोमय्या यांनी दिली आहे. त्याप्रमाणे त्यांनी आज तक्रार दाखल केली आहे.

 

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments