R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "किरीट सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर मुंबै बँकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढावा"

“किरीट सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर मुंबै बँकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढावा”

 

भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभाराच्या चौकशीचे आदेश राज्याच्या सहकार खात्याने दिले आहेत. यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून, किरीट सोमय्या यांच्यात हिंमत असेल, तर मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढावा, असे आव्हान दिले आहे.

सोमय्या गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षाविरुद्ध चांगलेच आक्रमक झाले आहेत. किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सोमय्यांनी मुश्रीफांवर आरोप केल्यानंतर त्यांना कोल्हापूरात जाण्यापासून बंदी घालण्यात आली होती. त्यतच्च आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमय्यांना थेटमुंबै बँकेतील घोटाळा बाहेर काढण्याचे आवाहन केले आहे.

आम्ही साखर कारखान्यांचा गैरव्यवहार बाहेर काढताना प्रांत, पक्ष असा भेदभाव कधीच केला नाही. देशातील सर्व राज्यातील साखर कारखान्यांचा गैरव्यवहार बाहेर काढला. सोमय्या मात्र विशिष्ट पक्षाच्या राजकीय नेत्यांच्या मागे लागले आहेत. विशिष्ट नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. शेतकऱ्यांचा वापर राजकारणासाठी करत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भ्रष्टाचार बाहेर काढावा, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments