R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या कुटुंबप्रमुखाला जनतेचा आवाजच ऐकू येत नाही, बलात्कार घटनेवरून चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला 

कुटुंबप्रमुखाला जनतेचा आवाजच ऐकू येत नाही, बलात्कार घटनेवरून चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला 

 

 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र महिला अत्याचाऱ्यांच्या घटना वादात असून याच मुद्द्यावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली होती. आधी मुंबईतील साकीनाका आणि नंतर डोंबिवलीमध्ये सामुहिक बलात्काराच्या घटना घडल्या. त्यानंतर आता कल्याणमध्ये एका ८ वर्षाच्या मुलीवर आणि महाबळेश्वरमध्येही एका मुलीवर आत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. यावरुन आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

 

 

मुंबईतील साकीनाका आणि नंतर डोंबिवलीमध्ये सामुहिक बलात्काराच्या घटना घडल्या. या घटनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले आहेत. पण, त्यानंतरही कल्याण आणि महाबळेश्वरमध्ये अशाच घटना घडत आहेत. यावरुन चंद्रकांत पाटलांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

 

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, कल्याणमध्ये अवघ्या ८ वर्षांच्या मुलीवर तर महाबळेश्वर मध्ये देखील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे.  मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना माझे एकच सांगणे आहे. ही वेळ गायब होण्याची नव्हे, तर अत्याचाराचे हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याची आहे ! असे ट्विट त्यांनी केले आहे.

 

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments