R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home देश मोदी-बायडन भेट | संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्यासंदर्भात चर्चा

मोदी-बायडन भेट | संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्यासंदर्भात चर्चा

 

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसाच्या अमेरिका दौऱ्यावर असून तब्बल ते दीड वर्षांनी अमेरिका दौरा करणार आहेत. या दौऱ्याकडे सर्व भारतीयांचे तसेच भारत विरोधी कारवाया करणाऱ्या देशांचे सुद्धा लक्ष लागून राहिले आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये जो बायडन यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी कोविड -19 आणि हवामान बदल, व्यापार आणि इंडो-पॅसिफिकसह अनेक प्राधान्य मुद्द्यांवर चर्चा केली.

या बैठकीबद्दल माहिती देताना भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिकेच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांची घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान जो बायडन यांच्यासोबत पंतप्रधान मोदींची ही पहिली भेट होती.या भेटीवेळी जो बायडन यांनी कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान भारत सरकारने घेतलेल्या निर्णयांचे कौतुक केले. त्यांनी लसीची निर्यात पुन्हा सुरू करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले.

तसेच या दोन्ही नेत्यांमध्ये भारत-अमेरिका संरक्षण संबंधांवर चर्चा झाली. दोन्ही देशांनी संरक्षण क्षेत्रात नवीन उच्च तंत्रज्ञान प्रकल्पांवर एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळायला हवं, असे मत व्यक्त केले. तसे भारत आणि अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतं, काँग्रेसची जळजळीत टीका

  सध्या कर्नाटकात पोट निवडणुकीच्या जोरदार प्रचार सुरु असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडायला सुरवात केली आहे. मात्र आता या पोट निवडणुकीच्या...

” देशात कोळशाची टंचाई नाही, महाराष्ट्र सरकार ने दोषारोपण करू नये.” केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे.

  राज्यातील वीज उत्पादन संकटास केन्द्र सरकारकडून कोळसा पुरवठा होत नसल्याचे कारण देऊन करण्यात येत असलेल्या आरोपात अजिबात सत्यता नाही. केन्द्र सरकारने राज्य सरकारला पावसाळा...

केंद्रात मंत्री असूनही नारायण राणे यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान नाही

  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून आपली नवी टीम जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातून पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, माजी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments