R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या सरकार चालवता येत नसेल तर खुर्च्या उबवायचं काम करु नका, राजीनामा द्या...

सरकार चालवता येत नसेल तर खुर्च्या उबवायचं काम करु नका, राजीनामा द्या – राम सातपुते

 

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागामध्ये खाली असलेल्या जागांसाठी भरती निघाली होती. तसेच या भरतीसाठी अथय प्रमाणात इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. आरोग्य विभागातील पद भरतीसाठी २६ सप्टेंबर रोजी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. पण हॉल तिकिटात संबंधित एजन्सीने प्रचंड गोंधळ घातल्याचं समोर आलं होतं. हॉल तिकीटमध्ये अनेक चुका समोर आल्या होत्या. त्यामुळे अखेर आरोग्य विभागाकडून ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या या निर्णयानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

भाजपने ठाकरे सरकार तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर सडकून टीका केली आहे. जमत नसेल तर खुर्च्या खाली करा, अशी टीका भाजप आमदार राम सातपुते यांनी राजेश टोपेंवर केली आहे.राज्यातील विद्यार्थ्यांचं वाटोळं करण्याचा ठेका ठाकरे सरकारने घेतलेला आहे. या सरकार मधील कोणी जाणते राजे वगैरे कोणी असतील त्या सगळ्यांचा मी निषेध करतो आणि सरकारमधल्या लोकांना लाज वाटत असेल तर त्यांनी हे सरकार स्वत:हून बरखास्त केलं पाहिजे, असा हल्लाबोल राम सातपुते यांनी केलाय.

हे कर्मदरिद्री निष्ठूर सरकार विद्यार्थ्यांच्या जीवावरती उठलेले आहेत. गरीब कष्टकरी विद्यार्थ्यांना त्रास देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. मी या सरकारला इशारा देतो की जर या सरकार मधील लोकांना जर सरकार चालवता येत नसेल तर त्यांनी खुर्च्या उबवायचं काम करु नये. त्यांनी राजीनामा देऊन घरी बसा अशी टीका राम सातपुते यांनी केली आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments