R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या हैद्राबादमध्ये सोनू सूद उभारणार रुग्णालय, "मी असेन किंवा नसेन, गरीब रुग्णांवर मोफत...

हैद्राबादमध्ये सोनू सूद उभारणार रुग्णालय, “मी असेन किंवा नसेन, गरीब रुग्णांवर मोफत उपचार व्हायला हवेत”

 

कोरोना संसर्गाच्या काळात अनेक परप्रांतीय नागरिकनांसाठी धावून आलेला अभिनेता सोनू सूद सध्या आयकर विभागाच्या रडारवर असून मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या होत्या. तसेच सोनू सूदकडून चालवण्यात येत असलेल्या फाऊंडेशनच्या निधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

सोनू सूदवर कर चुकवेगिरीचा आरोप करण्यात आला होता. या आरोपाचं खंडन सोनू सूदनं केले. आता सोनू सूद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोनूनं आयकर विभागाची कारवाई आणि हैदराबाद इथं हॉस्पिटल उघडण्याच्या योजनेवर भाष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी सोनू सूद याच्यावर १८ कोटी कर चोरी केल्याचा आरोप लावण्यात आला होता.

सोनू सूद म्हणाला की, कुठल्याही फाऊंडेशनकडे त्यांना मिळालेल्या पैशाचा वापर एक वर्षाच्या कालावधीत करण्याची मर्यादा असते. जर फंडचा वापर एक वर्षात नाही झाला तर त्याचा वापर पुढील वर्षी करू शकतात. मी कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान एका फाऊंडेशनची स्थापना केली होती. पहिल्या लाटेवेळी आम्ही प्रवाशांसाठी खूप काम केले. तेव्हा अनेकजण मला मजुरांसाठी बसेस बुक करण्याची ऑफर दिली होती. आम्ही तेव्हा पैसे जमा करत नव्हतो असं त्याने सांगितले.

दरम्यान, हैदराबादमध्ये आगामी काळात एक हॉस्पिटल उघडण्याचा मानस आहे. जितके लोक आमच्याकडे मदतीसाठी आले त्यातील बहुतांश जणांवर हैदराबादमध्ये उपचार झालेत. हैदराबादेतील हॉस्पिटलचं तंत्रज्ञान वेगळ्याच उंचीवर आहे.येणाऱ्या ५० वर्षासाठी अशी योजना बनवली जात आहे. ज्यात सोनू सूद असेल किंवा नसेल हे चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये लोकांना मोफत उपचार दिले जातील असं सोनू सूदने सांगितलं.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments