R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'सेना-भाजप लवकरच विकासाच्या अजेंड्यावर एकत्र येतील!' राज्यपाल कोश्यारी यांचे सूचक विधान

‘सेना-भाजप लवकरच विकासाच्या अजेंड्यावर एकत्र येतील!’ राज्यपाल कोश्यारी यांचे सूचक विधान

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि महविकास आघाडी सरकारमध्ये अनेक मुद्द्यावरून वाद होतं असल्याचे चित्र दिसून आले होते. त्यातच शिवसेना उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस रघुनाथ कुचिक यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेउन त्यांना ‘शिवसेना – अस्मिता, संघर्ष, वाटचाल’ हे पुस्तक भेट दिले.

पुस्तक हातात पडताच राज्यपाल कोश्यारी ते वाचण्यासाठी उत्सुक होते आणि त्यांनी लगेचच दोन पाने वाचली देखील आणि संपुर्ण पुस्तक वाचण्यात रस असल्याचे म्हटले. ‘गेल्या ५० वर्षातील शिवसेनेचा प्रवास’ याचे उत्तम वर्णन पुस्तकातील २१ अध्यायात आहेत. असे कौतुक त्या पुस्तकाचे केले होते. त्यातच खुद्द कोश्यारी यांनीही यावेळी शिवसेना पक्षाच्या वाटचालीचे कौतुक केले होते.

तीस मिनिटांच्या दीर्घ चर्चेत दोघांमध्ये शिवसेनेचे झंझावाती नेतृत्व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या करिष्म्याचा सेना-भाजप युतीला गेल्या दोन दशकात कसा फायदा झाला, यासह शिवसेनेची कामगार चळवळ व त्याचा आजवर विविध क्षेत्रांना झालेला फायदा यावर चर्चा केली. सेना-भाजप लवकरच विकासाच्या अजेंड्यावर एकत्र येतील याबद्दल राज्यपालांनी विश्वास व्यक्त केला.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

Recent Comments